शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

हायप्रोफाईल चोर, हवेतल्या हवेत मारायचा मौल्यवान दागिन्यांवर डल्ला, वर्षभरात २०० विमानात केली चोरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 13:08 IST

Crime News: विमानांमध्ये मौल्यवान वस्तू घेऊन प्रवास करणऱ्या प्रवाशांना हेरून त्यांच्याकडील दागदागिने तसेच मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या एका हायप्रोफाईल चोराला दिल्ली पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. या चोराचं नाव राजेश कपूर असं असून, त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ विमानामधून प्रवास करतानाच चोऱ्या करायचा.

विमानांमध्ये मौल्यवान वस्तू घेऊन प्रवास करणऱ्या प्रवाशांना हेरून त्यांच्याकडील दागदागिने तसेच मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या एका हायप्रोफाईल चोराला दिल्ली पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. या चोराचं नाव राजेश कपूर असं असून, त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ विमानामधून प्रवास करतानाच चोऱ्या करायचा. तो विमानातून प्रवास करत असताना प्रवाशांच्या हँडबॅगमधील दागिने आणि इतर मौल्यवान सामानावर डल्ला मारायचा. पोलिसांनी पहाडगंज परिसरातून आरोपी राजेश कपूरला अटक केली आहे. या हायप्रोफाईल चोराबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी राजेश कपूरने चोरी करण्यासाठी मागच्या वर्षभरात तब्बल २०० हून अधिक वेळा विमान प्रवास केला. तसेच यादरम्यान, तो ११० दिवसांहून अधिक काळ केवळ विमानामध्येच राहिला. राजेश कपूर याला पहाडगंज येथून अटक करण्यात आली  असून, त्याने तिथेच चोरीचे दागिने आणि इतर मुद्देमाल लपवून ठेवला होता, अशी माहिती पोलिस उपायुक्त (आयजीआय) उषा रंगनानी यांनी दिली आहे.

त्यांनी सांगितले की, आरोप हा ऐवज शरद जैन यांना विकण्याच्या तयारीत होता. त्यालाही करोल बाग येथून अटक करण्यात आली आहे. रंगनानी यांनी सांगितले की, मागच्या तीन महिन्यांमध्ये वेगवेगळ्या विमानांमधून चोरीच्या दोन घटना उघडकीस आल्या होत्या. त्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी आयजीआय विमानतळावर एक विशेष पथक स्थापन करण्यात आलं होतं.

पोलिसांनी सांगितलं की, कसून चौकशी केल्यानंतर आरोपीने हैदराबादमधील पाच विमान प्रवासादरम्यान झालेल्या चोरींमध्ये आपला हात असल्याचे मान्य केले.  तसेच बहुतांश रक्कम ऑनलाईन आणि ऑफलाईन जुगारामध्ये खर्च केल्याचे त्याने मान्य केले. त्याशिवाय राजेश कपूर हा चोरी, गुगार आणि इतर गुन्हेगारी प्रकरणांच्या ११ घटनांमध्ये सहभागी असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आरोपी राजेश कपूर हा आंतरराष्ट्रीय विमान प्रवासादरम्यान वृद्ध महिलांना लक्ष्य करायचा, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. 

अधिकाऱ्याने सांगितले की, हँडबॅगमधून मौल्यवान वस्तू नेणाऱ्या प्रवाशांवर आरोपी पाळत ठेवायचा. तसेच असे प्रवासी प्रवासाला प्राधान्य देतात अशा देशांतर्गत प्रीमियम विमान उड्डाणे विशेषकरून एअर इंडिया आणि विस्तारा अशा विमानांमधून तो प्रवास करायचा. बोर्डिंगमधील दुरावस्थेचा फायदा घेऊन आरोपी ओव्हरहेड केबिनमध्ये ठेवलेल्या हँडबॅगची हुशारीने चाचपणी करून त्यामधील सामान चोरायचा.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीairplaneविमान