शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

पुढील 5 दिवस या 4 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशात पावसाचा हाय अलर्ट, IMD ने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 11:18 IST

काश्मीरमध्ये थंडीची लाट पसरली, सोमवारी रात्री उणे 2.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.

नवी दिल्ली: भारतीय हवामान खात्याने केरळसह 4 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात हलका ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. याबाबत हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशाराहवामान खात्याच्या (IMD) अंदाज आणि चेतावणीनुसार, पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाव्यतिरिक्त कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडूच्या दक्षिणेकडील अंतर्गत भागात पुढील 5 दिवसांत हलका ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यादरम्यान 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय 27 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशातील यानम आणि रायलसीमा व्यतिरिक्त दक्षिण किनारपट्टी भागात जोरदार पाऊस पडेल. यासोबतच हवामान खात्याने तामिळनाडूसाठी 25-26 नोव्हेंबरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

वाऱ्याचा वेग जास्त असण्याची शक्यता

26 आणि 27 नोव्हेंबर रोजी तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनारे आणि मन्नारच्या खाडीवर तसेच नैऋत्य आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. या दरम्यान, वारा 40-60 किमी प्रतितास वेगाने वाहू शकतो. हवामान खात्याने मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मच्छिमारांना समुद्रात मासेमारी करू नये आणि त्यांना समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. 

काश्मीरमध्ये थंडीची लाट, पारा घसरला

उत्तर भारतात तापमानाचा पारा घसरायला लागला असून थंडी सतत वाढत आहे. काश्मीरमध्ये थंडीची लाट पसरली असून तापमानाचा पारा चांगलाच खाली आला आहे. श्रीनगरमध्ये सोमवारी रात्री उणे 2.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, ज्यामुळे ती आतापर्यंतची सर्वात थंड रात्र ठरली. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, काश्मीरमध्ये गेल्या काही रात्री तापमान शून्याच्या खाली नोंदवले जात असून बहुतांश ठिकाणी या हंगामातील सामान्य तापमानापेक्षा दोन ते तीन अंश सेल्सिअसने कमी तापमानाची नोंद केली जात आहे.  

टॅग्स :RainपाऊसTamilnaduतामिळनाडूAndhra Pradeshआंध्र प्रदेशKeralaकेरळKarnatakकर्नाटकJammu Kashmirजम्मू-काश्मीर