शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र, गुजरातमध्ये दहशतवादी हल्ल्याचा इशारा, देशभरात हायअलर्ट

By admin | Updated: December 8, 2014 16:43 IST

पाच संशयित दहशतवादी पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या इशा-यावर भारतात दहशतवादी हल्ला घडवण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ८ - मध्यप्रदेशमधील तुरुंगातून पळालेले पाच संशयित दहशतवादी पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या इशा-यावर भारतात दहशतवादी हल्ला घडवण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. महाराष्ट्र, गुजरातसह देशभरातील अन्य प्रमुख शहरांना दहशतवादी लक्ष्य करण्याची शक्यता असल्याने देशभराच हायअलर्ट देण्यात आला आहे. 
काही महिन्यांपूर्वी मध्यप्रदेशमधील तुरुंगातून  पाच संशयित दहशतवाद्यांनी पळ काढला होता. हे पाचही जण सिमी संघटनेशी संबंधीत होते. या पाच जणांनी बॅंकेमध्ये लुटमारी करुन दहशतवादी हल्ल्यासाठी पैसे जमवल्याची माहितीही गुप्तचर यंत्रणेला मिळाली आहे. आयएसआयच्या इशा-यावर हे हल्ले होतील अशी माहिती उघड झाली असून या पार्श्वभूमीवर देशभरात हायअलर्ट देण्यात आला आहे.