पठाणकोटमध्ये संशयित दिसल्याने हाय अ‍ॅलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:56 IST2018-04-20T00:56:09+5:302018-04-20T00:56:09+5:30

लष्कराच्या गणवेशातील दोन संशयितांनी एकाची कार पळविल्याची माहिती आहे.

High alert due to suspected suspect in Pathankot | पठाणकोटमध्ये संशयित दिसल्याने हाय अ‍ॅलर्ट

पठाणकोटमध्ये संशयित दिसल्याने हाय अ‍ॅलर्ट

पठाणकोट : पंजाबच्या पठाणकोट हवाई तळापाशी दोन संशयित इसम दिसल्यामुळे खळबळ उडाली असून, तिथे अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. काही स्थानिकांनी संशयितांना पाहिल्याचा दावा केल्यानंतर हवाई तळाच्या व शहराच्या परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून, लष्करासह पंजाब पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.
लष्कराच्या गणवेशातील दोन संशयितांनी एकाची कार पळविल्याची माहिती आहे. त्यांचा शोध सुरू आहे. सर्व वाहनांची तपासणीही सुरू आहे. रविवारी मस्कीन अली नावाच्या एका व्यक्तीकडे लष्करी गणवेशातील दोघांनी लिफ्ट मागितली. ते जवान आहेत, असे समजून त्याने त्यांना कारमध्ये घेतले. पण नंतर त्या दोघांनी अलीला मारहाण करून कारमधून बाहेर काढले आणि पळ काढला. अलीने लगेचच पोलिसांना ही मााहिती दिली. याआधी पठाणकोटच्या हवाई तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यामुळे या वेळी अ‍ॅलर्ट जारी करून, काळजी घेतली जात आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: High alert due to suspected suspect in Pathankot