गोव्यातल्या फॅब इंडियाच्या चेंजिंग रुममध्ये स्मृती इराणींनी पकडला छुपा कॅमेरा
By Admin | Updated: April 3, 2015 18:03 IST2015-04-03T16:06:41+5:302015-04-03T18:03:01+5:30
गोव्यातल्या फॅब इंडियाच्या चेंजिंग रूममध्ये हिडन कॅमेरा रोखला असल्याचा अनुभव खुद्द मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांना आला

गोव्यातल्या फॅब इंडियाच्या चेंजिंग रुममध्ये स्मृती इराणींनी पकडला छुपा कॅमेरा
>ऑनलाइन लोकमत
कँडोलिम ( गोवा), दि. 3 - गोव्यातल्या फॅब इंडियाच्या चेंजिंग रूममध्ये हिडन कॅमेरा रोखला असल्याचा अनुभव खुद्द मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांना आला असून या बाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा कॅमेरा चार महिन्यांपूर्वी बसवण्यात आला असून स्थानिक भाजपा आमदार मायकेल लोबो यांनी धक्काच बसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
या संपूर्ण भागामधल्या दुकानांची तपासणी करावी आणि अन्य कुठल्या दुकानांनी असला प्रकार केलाय का याचा तपास करावा अशी सूचना पोलीसांना केल्याचे लोबो यांनी सांगितले. दरम्यान, हा कॅमेरा सामानांची चोरी रोखण्यासाठी लावण्यात आला होता असे स्पष्टीकरण फॅबइंडियाच्या एमडीने दिले असून पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.