शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 12:33 IST

सैन्याचा जवान तस्करीत असल्याने आता पंजाब पोलिसांचे बडे अधिकारी देखील सतर्क झाले असून आरोपीने आतापर्यंत कितीवेळा श्रीनगरहून पंजाबमध्ये ड्रग्जची तस्करी केली याचा तपास केला जात आहे. 

भारतीय सैन्यात श्रीनगरमध्ये एलओसीवर तैनात असलेल्या जवानाकडे हेरॉईन सापडल्याने खळबळ उडाली आहे. लुधियानाचा रहिवासी असलेल्या विक्रमजीत सिंग याला लुधियाना पोलिसांनी २५५ ग्रॅम हेरॉईनसह अटक केली आहे. ड्रग्ज तस्करीमध्ये सैन्यातील जवानाचा हात असल्याने पोलीस यंत्रणेसह सैन्य दलातही खळबळ उडाली आहे. 

विक्रमजीतने श्रीनगरहून हेरॉईनची तस्करी करून ते पंजाबमध्ये विकण्यासाठी आणले होते. सैन्याचा जवान तस्करीत असल्याने आता पंजाब पोलिसांचे बडे अधिकारी देखील सतर्क झाले असून आरोपीने आतापर्यंत कितीवेळा श्रीनगरहून पंजाबमध्ये ड्रग्जची तस्करी केली याचा तपास केला जात आहे. 

वरिष्ठ पोलिस अधीक्षक अंकुर गुप्ता यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली आहे. आरोपीला कोठडीत घेऊन त्याची कसून चौकशी केली जात आहे. अनेक महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले. 

विक्रमजीत सिंग हा १० मे रोजी रजेवर गावी आला होता. जोधनच्या मुख्य बाजारात जोधन पोलिस स्टेशनचे प्रभारी साहिबमीत सिंग आणि उपनिरीक्षक गुरचरण सिंग संशयास्पद वाटणाऱ्या लोकांची तपासणी करत होते. तेव्हा विक्रमजीतची तपासणी केली असता त्याच्याकडे २५५ ग्रॅम हेरॉईन सापडले. विक्रमजीतच्या पॅन्टच्या उजव्या खिशात एक लिफाफा होता, त्यात हे हेरॉईन होते. त्याने आपण सैन्यात असल्याचे पोलिसांना सांगितले. त्याची गाडीही जप्त करण्यात आली आहे. याचबरोबर मोबाईल जप्त करून तपासासाठी सायबर सेलची मदत घेण्यात येत आहे.

भारत-पाक सीमेवर तणाव असताना एकीकडे सुट्टीवर आलेल्या सैनिकांना सीमेवर बोलावण्यात आलेले असताना विक्रमजीत सिंग याला सैन्यातून सुट्टी कशी मिळाली, असा सवालही उपस्थित होत आहे. भारतीय सैन्यालाही याची माहिती देण्यात आली आहे.  

टॅग्स :Drugsअमली पदार्थIndian Armyभारतीय जवानPunjabपंजाबCrime Newsगुन्हेगारी