हेमंत कोल्हे यांचे निधन

By Admin | Updated: October 21, 2016 00:18 IST2016-10-21T00:18:24+5:302016-10-21T00:18:24+5:30

नरखेड : स्थानिक रहिवासी हेमंत रामभाऊ कोल्हे (४८) यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत शुक्रवारी (दि. २१) सकाळी १०.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्यापश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्तपरिवार आहे.

Hemant Kolhe passed away | हेमंत कोल्हे यांचे निधन

हेमंत कोल्हे यांचे निधन

खेड : स्थानिक रहिवासी हेमंत रामभाऊ कोल्हे (४८) यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत शुक्रवारी (दि. २१) सकाळी १०.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्यापश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्तपरिवार आहे.
*
सूरदास घरडे
मांढळ : कुही तालुक्यातील दहेगाव येथील रहिवासी सूरदास ताराचंद घरडे (७०) यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा आप्तपरिवार आहे.
*
श्रद्धानंद खडस्कर
मोहपा : स्थानिक नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी श्रद्धानंद ऊर्फ शिवाजी बळीरामजी खडस्कर (६४) यांचे गुरुवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर स्थानिक म्हसेपठार मार्गावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली असा आप्तपरिवार आहे.
*
उकंडराव बोराडे
मोहपा : नजीकच्या खुमारी येथील रहिवासी तथा सेवानिवृत्त ग्रामसेवक उकंडराव जानबाजी बोराडे (६८) यांचे बुधवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा आप्तपरिवार आहे.

Web Title: Hemant Kolhe passed away