हॅलो ५ - कोरगावात, मुख्यमंत्री सभापतींचा सत्कार

By Admin | Updated: December 23, 2014 00:04 IST2014-12-23T00:04:03+5:302014-12-23T00:04:03+5:30

पेडणे : कोरगाव येथील श्री कमळेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व सभापती राजेंद्र आर्लेकर यांचा सत्कार करण्यात आला.

Hello 5 - Honoring Chief Minister Chairmen in Korgat, | हॅलो ५ - कोरगावात, मुख्यमंत्री सभापतींचा सत्कार

हॅलो ५ - कोरगावात, मुख्यमंत्री सभापतींचा सत्कार

डणे : कोरगाव येथील श्री कमळेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व सभापती राजेंद्र आर्लेकर यांचा सत्कार करण्यात आला.
श्री कमळेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष दशरथ गावडे तर सभापती राजेंद्र आर्लेकर यांचा सत्कार रमेश शेटये यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सरपंच पंढरी आरोलकर, विद्यालयाचे प्राचार्य सुदन बर्वे, व्यवस्थापक व्यंकटेश घोडगे, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष उल्हास आरोलकर, ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक वासुदेव शेटये, कृष्णा गावडे, कृष्णा शेटये, सद्गुरू गावडे, प्रशांत बर्वे, भीवा गावडे, विठोबा बगळी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री व सभापतींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केली. सूत्रसंचालन विठोबा बगळी यांनी तर दीपश्री सोपटे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Hello 5 - Honoring Chief Minister Chairmen in Korgat,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.