हॅलो-३ - कामुर्ली पीपल्स हायस्कूलचे स्नेहसंमेलन

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:17+5:302015-02-18T00:13:17+5:30

कामुर्ली : आपल्या मुलांना कुष्णरूपी बनवायचे असल्यास उत्तम संस्काराची आवश्यकता आहे. यासाठी पालकांनी शिक्षकांवर पूर्णपणे अवलंबून राहू नये. स्वत: चांगले संस्कार करण्याचे आवाहन सारस्वत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप जोशी यांनी केले.

Hello-3 - Memorable meeting of Cameli People's High School | हॅलो-३ - कामुर्ली पीपल्स हायस्कूलचे स्नेहसंमेलन

हॅलो-३ - कामुर्ली पीपल्स हायस्कूलचे स्नेहसंमेलन

मुर्ली : आपल्या मुलांना कुष्णरूपी बनवायचे असल्यास उत्तम संस्काराची आवश्यकता आहे. यासाठी पालकांनी शिक्षकांवर पूर्णपणे अवलंबून राहू नये. स्वत: चांगले संस्कार करण्याचे आवाहन सारस्वत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप जोशी यांनी केले.
पीपल्स हायस्कूल व कामुर्ली शाळा समूहाच्या वागाळी येथे झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी आमदार किरण कांदोळकर यांनी कामुर्लीतील विद्यार्थ्यांसाठी बक्षीसरूपी योजना जाहीर केल्या.
कामुर्ली सरपंच कल्पना दळवी, युवा सांस्कृतिक समिती अध्यक्ष शरद गाड, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष राजेश कापोलकर, गजानन मांद्रेकर, मुख्याध्यापक मोहन च्यारी, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष अरविंद वायंगणकर, श्री सरस्वती विद्यामंदिर पालक-शिक्षक संघाच्या अध्यक्षा दीपा शेट्ये उपस्थित होत्या. शिक्षक रामा हळर्णकर यांनी स्वागत केले. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले. (प्रतिनिधी)
फोटो : १) कामुर्लीत स्नेहसंमेलनाच्या शुभारंभप्रसंगी दीपप्रज्वलन करताना किरण कांदोळकर. बाजूला इतर मान्यवर. (जयेश नाईक)

Web Title: Hello-3 - Memorable meeting of Cameli People's High School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.