हॅलो 3- बिल्वदल संस्थेतर्फे डिचोली तालुका पत्रकारांचा सन्मान

By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:05+5:302015-08-02T22:55:05+5:30

डिचोली : ग्रामीण पत्रकारांना सरकारच्या विविध योजा लागू करण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य देण्याची तयारी दर्शविताना माहिती व प्रसिद्ध खात्याचे मंत्री मिलिंद नाईक यांनी प्रत्येक पत्रकाराने समाजाला दिशा देणारे लेखन करून समस्यांना वाचा फोडावी, असे आवाहन केले.

Hello 3- Dyoly taluka journalists honored by the Belvadal institution | हॅलो 3- बिल्वदल संस्थेतर्फे डिचोली तालुका पत्रकारांचा सन्मान

हॅलो 3- बिल्वदल संस्थेतर्फे डिचोली तालुका पत्रकारांचा सन्मान

चोली : ग्रामीण पत्रकारांना सरकारच्या विविध योजा लागू करण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य देण्याची तयारी दर्शविताना माहिती व प्रसिद्ध खात्याचे मंत्री मिलिंद नाईक यांनी प्रत्येक पत्रकाराने समाजाला दिशा देणारे लेखन करून समस्यांना वाचा फोडावी, असे आवाहन केले.
पत्रकार दिनानिमित्त बिल्वदल संस्थेतर्फे डिचोली तालुक्यातील पत्रकारांचा गौरव सोहळा विठ्ठलापूर येथे जावडेकर सभागृहात आयोजिला होता.
व्यासपीठावर डॉ. सोमनाथ कोमरपंत, विनोद गाडगीळ, अध्यक्ष सागर जावडेकर, म. कृ. पाटील, अँड. करुणा बाक्रे उपस्थित होते.
यावेळी गेली अनेक वर्षे पत्रकारितेत कार्यरत असलेले विशांत वझे, तुकाराम सावंत, श्याम गावकर, संजीव प्रभू खानोलकर, यशवंत परब, राजेश वझरीकर, काशिनाथ मयेकर,, रवीराज च्यारी, दुर्गादास गर्दे, सुरेश बायेकर, चंद्रशेखर देसाई, उदय परब आदींचा मंत्री मिलिंद नाईक यांच्या हस्ते शाल, र्शीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
स्वागतपर भाषणात सागर जावडेकर यांनी ग्रामीण भागातील पत्रकारांना सामाजिक सेवा कार्यात सक्रियपणे कार्य करताना अनेक समस्या मांडून त्या सोडवण्यासाठी योग0ान दिलेले आहे. पत्रकारांना त्यांच्या सेवेचे फळ मिळणे गरजेचे असून शआबासकीची गरज असल्याचे सांगितले.
म. कृ. पाटील यांनी टिळकांची पत्रकारिता पुढे चालवण्यासाठी ध्येयवादी बनून पत्रकारांनी आपले काम करण्याचे आवाहन केले.
मिलिंद नाईक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व टिळकांचे पूजन करून पत्रकार दिन कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
सूत्रसंचालन राघोबा पेडणेकर यांनी केले. विशांद वझे यांनी पत्रकारांच्यावतीने कृतज्ञता व्यक्त केली. करुणा बाक्रे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
फोटो ओळी-
डिचोली तालुक्यातील पत्रकारांचा बिल्वदल संस्थेतर्फे मंत्री मिलिंद नाईक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सोबत सर्व पत्रकार, डॉ. सोमनाथ कोमरपंत, सागर जावडेकर, म. कृ. पाटील व इतर. (विशांत वझे)

Web Title: Hello 3- Dyoly taluka journalists honored by the Belvadal institution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.