हॅलो 2-भजन स्पर्धेत कुळाची माया तेजोमय मंडळ प्रथम
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:41+5:302015-08-26T23:32:41+5:30
हणजूण : र्शी विठ्ठल-रखुमाई महिला भजनी मंडळ हुडोवाडा-कायसूव आयोजित दुसर्या अखिल गोवा महिला भजनी स्पर्धेत केरी-सत्तरी येथील र्शी कुळाची माया तेजोमय महिला भजनी मंडळाला पहिले पारितोषिक प्राप्त झाले.

हॅलो 2-भजन स्पर्धेत कुळाची माया तेजोमय मंडळ प्रथम
ह जूण : र्शी विठ्ठल-रखुमाई महिला भजनी मंडळ हुडोवाडा-कायसूव आयोजित दुसर्या अखिल गोवा महिला भजनी स्पर्धेत केरी-सत्तरी येथील र्शी कुळाची माया तेजोमय महिला भजनी मंडळाला पहिले पारितोषिक प्राप्त झाले. हुडोवाडा-कायसूव येथील र्शी विठ्ठल-रखुमाई देवस्थानात सभामंडपात स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे उद्घाटन शिवोलीचे आमदार तथा जलस्रोतमंत्री दयानंद मांद्रेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष वासुदेव कोरगावकर, हणजूण-कायसूव पंचसदस्य सुहासिनी गोवेकर, राम मांद्रेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत अनुक्रमे युवती भजनी मंडळ (अडकोण-बाणास्तरी), महागणपती महिला मंडळ (आमोणा) यांना पारितोषिक मिळाले. तर उत्तेजनार्थ अनुक्रमे भगवती भजनी मंडळ (चिंबल), र्शीराम महिला भजनी मंडळ (आस्कावाडा-मांद्रे), स्वरगंधा महिला भजनी मंडळ (चिंबल) यांना पारितोषिक मिळाले. उत्कृष्ट गायक लीला सतरकर (युवती भजनी मंडळ), उत्कृष्ट हार्मोनियम प्रियंका चोडणकर, (शिवप्रसाद सातेरी महिला भजनी मंडळ तुये), उत्कृष्ट पखवाज ऐश्वर्या कवठणकर (र्शी संप्रदाय सांस्कृतिक महिला भजनी मंडळ रेवोडा), उत्कृष्ट गवळण गायन लता गावस (र्शी कुळाची माया तेजोमय भजनी मंडळ केरी), विशेष पारितोषिक पखवाज साथी योग घोगटे (शिवप्रसाद सातेरी महिला भजनी मंडळ तुये) यांना पारितोषिके मिळाली. या भजनी स्पर्धेचे परीक्षण शिवा ताम्हणकर व सुदन फडते यांनी केले. (वार्ताहर) फोटो : हुडोवाडो-कायसूव येथे अखिल गोवा महिला भजनी स्पर्धेचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करताना मंत्री दयानंद मांद्रेकर. सोबत वासुदेव कोरगावकर, सुहासिनी गोवेकर व इतर. (रश्मीत नाईक) 2408-एमएपी-01