हॅलो २-

By Admin | Updated: July 3, 2015 23:00 IST2015-07-03T23:00:06+5:302015-07-03T23:00:06+5:30

दामोदर बोरकर यांची अध्यक्षपदी निवड

Hello 2- | हॅलो २-

हॅलो २-

मोदर बोरकर यांची अध्यक्षपदी निवड
मडगाव : आके सार्वजनिक श्री गणेशोत्सव युवक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंडळाच्या कार्यालयात पार पडली. या वेळी २0१५ ते २0१७ या सालासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी दामोदर बोरकर, सचिव मंगलदास शिरोडकर, खजिनदार संदेश नाईक, उपाध्यक्ष १ रवींद्र कोरगावकर, उपाध्यक्ष २ सतीश नाईक, खजिनदार संदेश नाईक, सदस्य उदय दुर्भाटकर, देविदास च्यारी, दामोदर शिरोडकर, राजन गावकर, उमेश बांदोडकर, गौतम नाईक, विनय शिरोडकर, दिगंबर कोरगावकर, दीपक गडेकर, गोविंद पुजारी, सुभाष बने, प्रकाश मोरजकर, वीरेंद्र कोरगावकर, सचिन सातार्डेकर, नारायण कुराडे, चंद्रकांत पाटील यांची निवड झाली आहे. शिवाय २0१५ सालचा गणेशोत्सव व्यवस्थित पार पडण्यासाठी चार उपसमित्या सभासदांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आल्या.
दरम्यान, आके सार्वजनिक श्री गणेशोत्सव युवक मंडळातर्फे वार्षिक अखिल गोवा पातळीवरील स्व. तुकाराम कोरगावकर स्मृती भजनी स्पर्धा दि. २३ ऑगस्ट रोजी व अखिल गोवा पातळीवरील स्व. बाबुली गंगाराम स्मृती घुमट आरती स्पर्धा दि. ३0 ऑगस्ट रोजी दवर्ली येथील श्री मारुती मंदिराच्या पटांगणात घेतल्या जातील.
मंडळाची दुसरी अभंग गायन स्पर्धा दि. २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून खास उभारलेल्या मंडपात घेण्यात येईल. ही स्पर्धा १५ वर्षांखालील मुला-मुलींसाठी आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Hello 2-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.