हॅलो 1- एकाच मखरात दोन गणेश वेलवाडा-पैंगीणची परंपरा
By Admin | Updated: September 11, 2015 21:24 IST2015-09-11T21:24:58+5:302015-09-11T21:24:58+5:30
काणकोण : काणकोणात विविध ठिकाणी विविध प्रकारे गणेश चतुर्थी साजरी करण्याची परंपरा आहे. यात मार्ली व तिरवाळ या वाड्यांवर एक वाडा एक गणपती अशी परंपरा आहे. महालवाडा येथे सारस्वतांच्या घरामध्ये पत्रीचा गणपती तर वेलवाडा-पैंगीण येथील उदय गडो यांच्या निवासस्थानी एका मखरात दोन गणपती पुजण्याची परंपरा सुरू आहे.

हॅलो 1- एकाच मखरात दोन गणेश वेलवाडा-पैंगीणची परंपरा
क णकोण : काणकोणात विविध ठिकाणी विविध प्रकारे गणेश चतुर्थी साजरी करण्याची परंपरा आहे. यात मार्ली व तिरवाळ या वाड्यांवर एक वाडा एक गणपती अशी परंपरा आहे. महालवाडा येथे सारस्वतांच्या घरामध्ये पत्रीचा गणपती तर वेलवाडा-पैंगीण येथील उदय गडो यांच्या निवासस्थानी एका मखरात दोन गणपती पुजण्याची परंपरा सुरू आहे.मार्ली व तिरवाळ हे वाडे पैंगीण पंचायत क्षेत्रात येतात. या वाड्यांवर प्रत्येकी वीसच्या आसपास घरे आहेत. ही कुटुंबे अनुसूचित जमातीतील आहेत. या वाड्यांवर एकच गणपती पुजण्याची परंपरा गेली अनेक वर्षे सुरू आहे. कोणाही कुटुंबाला गणपती आपल्या घरी पूजला जावा अशी इच्छा किंवा विचार नाही. पूर्वी वाड्यावरील प्रमुखाच्या घरी गणेश चतुर्थी साजरी केली जायची. मार्ली वाड्यावर आता देवघरात गणपती मूर्तीची स्थापना केली जाते.मार्ली व तिरवाळ वाड्यांवर एकेक गणपती असल्याने वाड्यावरील सगळीच लहान-थोर मोठय़ा उत्साहाने व एकतेने या उत्सवात सहभागी होतात. पूजाअर्चेत सगळेजण सहभागी होता व एकत्र बसून जेवतात. गणेश चतुर्थीच्या दिवसात या वाड्यांवर उत्साहाला उधाण आलेले असते. एखाद्या कुटुंबाने गणपती ठेवून घ्यायचा नवस फेडायचे ठरवले तर दीड दिवसानंतर पुढील सर्व दिवस ते कुटुंब सगळा खर्च करतो. दीड दिवसापर्यंतचा खर्च सगळे मिळून करतात.पैंगीण पंचायत क्षेत्रातील महालवाड्यावरील सारस्वत ब्राह्मण कुटुंबांच्या घरांमध्ये गणेश चतुर्थीला शंकर व पार्वतीबरोबरच गणपतीचे कागदावरील चित्र पूजेला लावले जाते. एका काटकोन चौकोनी फ्रेममध्ये ही चित्रे चिकटवली जातात. यालाच पत्रीचा गणपती म्हणतात. विसर्जनाच्या वेळी विहिरीजवळ तिन्ही देवतांच्या चित्रांची फ्रेम नेलीजाते व विहिरीतील पाणी त्यावर शिंपडून विसर्जन केले जाते. आरत्या व इतर कार्ये अन्य गणपती पूजनाप्रमाणेच करतात.पैंगीणमधील वेलवाडा येथछील मुख्य गडो उदय गडो यांच्या घरी एकाच मखरात दोन गणपतीच्या मूर्तींची पूजा केलीजाते. गणेशमूर्तींची स्थापना, पूजाअर्चा व विसर्जन एकाच वेळी केले जाते. एका माटोळीखाली एका मखरात दोन गणपतींची परंपरा संपूर्ण काणकोणात उदय गडो यांच्याच घरी सुरू आहे.शिशेव्हाळ येथील बर्याच कुटुंबांचा गणपती महालवाडा येथील मठात पूजेला लावला जातो. वाहनातून 10 कि.मी. अंतरावरून सगळी मंडळी महालवाडा येते गणेश चतुर्थीच्या सणाला जातात.काणकोणातील बरीच कुटुंबे बर्याच वर्षांपूर्वी कामधंद्यानिमित्त मुंबईला गेलेली होती. चतुर्थीला मुंबईहून बरीच मंडळी आपल्या घरी येतात. सगळे जण एकत्रितपणे गणेशोत्सवात सहभागी होतात.गावात कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढत गेली तशी एकत्र कुटुंबे विभक्त झाली. घरे वेगळी बांधली गेली. त्यानंतर वेगळ्य़ा घरात गणेश चतुर्थीही साजरी केली जाऊ लागली. यामुळे गणेशमूर्ती स्थापन करणार्या घरांची संख्या वाढली आहे. तरीही काही जण विभक्त झाले तरी मूळ घरीच चतुर्थी साजरी करतात.ओझ्याची परंपरा कायमुलीचे लग्न झाल्यावर तिला पहिल्या चतुर्थीसाठी माहेरहून ओझे पाठविले जाते. मागील शेकडो वर्षे ही परंपरा टिकून आहे. या ओझ्यात माटोळी सामान, गावातील फळे, नारळ, केळीची पाने किंवा पत्रावळी, करंज्या व अन्य मिठाई, ताट व पूजेचे साहित्य, दाणे आदी मिळून ओझे बनवून चतुर्थीच्या एक-दोन दिवस आधी माहेरहून नवविवाहितेला पाठविले जाते. त्यानंतर दरवर्षी ओझे पाठविण्यास माहेरची माणसे विसत नाहीत; पण पहिल्या वर्षातील चतुर्थीचे ओझे खास असते.वैशिष्ट्यपूर्ण माटोळीकाणकोणातील गणेशोत्सवात माटोळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जंगलातील माडट वृक्षाचे कात्रे, कुड्याचे कात्रे, कांगोणे माटोळीला बांधणे अनिवार्य असते. त्याच बरोबर काकडी, दुधी भोपळा, निरफणस, चिकू, सोललेला नारळ, चिबूड, केळी, मोसंबी, संत्रे व अन्य उपलब्ध फळे माटोळीला बांधली जातात. माटोळीसाठी खास लाकडाच्या प?य़ा वापरून चौकट तयार केली जाते. ही चौकट गणपती स्थापन करण्याच्या जागेसमोर वर टांगली जाते. चतुर्थीच्या आदल्या रात्री या चौकटीला माटोळीचे साहित्य बांधले जाते. अलिकडे माटोळी सजवण्याच्या स्पर्धाही आयोजिल्या जात असल्याने माटोळीचे महत्त्व वाढलेले आहे. गोवा कला व संस्कृती खात्यातर्फे दरवर्षी राज्यभर माटोळी सजावट स्पर्धा आयोजिली जाते. पैंगीण येथील रूपेश पैंगीणकर व भाटपाल येथील शिरीष पै यांनी या स्पर्धेत बक्षिसे पटकावली आहेत.ज्या घरात गणपती स्थापन कला जातो, त्या घरासमोरील अंगणातील तुळसी वृंदावसनासमोर छोटीसी माटोळी बांधली जाते. यावरून लोकांना कोणत्या घरात गणपती आहे याची कल्पना येते व लोक त्या घराला भेट देऊन गणेशोत्सवात सहभागी होतात. पारंपरिक घुमट, शेमेळ व टाळ यांच्या वादनाची साथ गणेशोत्सवाला लाभते. सुवारी वादन व आरती गायन या वाद्यांमुळे खुलते व भावपूर्ण वातावरण निर्माण होते.(प्रतिनिधी)