हॅलो 1- शंकर मोरजेना ‘राष्ट्रीय भजन भूषण’ पुरस्कार
By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:19+5:302015-08-27T23:45:19+5:30
पेडणे : ज्येष्ठ भजनी कलाकार शंकर नवसो मोरजे यांची शिक्षक विकास परिषदेच्या यंदाच्या ‘राष्ट्रीय भजन भूषण’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

हॅलो 1- शंकर मोरजेना ‘राष्ट्रीय भजन भूषण’ पुरस्कार
प डणे : ज्येष्ठ भजनी कलाकार शंकर नवसो मोरजे यांची शिक्षक विकास परिषदेच्या यंदाच्या ‘राष्ट्रीय भजन भूषण’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे.ते गोमंतकातील एक ज्येष्ठ व र्शेष्ठ असे भजनी व नाट्य कलाकार आहेत. मा. नरहरीबुवा वळवईकर, अनंत पिळणकर, पंढरी शिरगावकर, विलास विर्नोडकर, तुकाराम शेटगावकर, रामा वळवईकर यांसारख्या दिग्गज गुरुवर्यांचे त्यांना भजन-गायन व पखवाजवादनासाठी मार्गदर्शन लाभले आहे. शास्त्रीय संगीतासाठी नारायण हळदणकर गुरूंचे मार्गदर्शन मिळाले आहे.गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये त्यांचे भजनाचे अनेक कार्यक्रम झालेले आहेत. अनेक नामवंत भजनी कलाकारांना त्यांनी साथसंगत केली आहे. तसेच पं. जितेंद्र अभिषेकी, स्नेहल भाटकरसारख्या मातब्बर कलाकारांच्या गायनाला मंजिरीची साथ केली आहे. कला अकादमी आयोजित भजनी स्पर्धांमध्येही ते सहभागी झाले आहेत.ते एक प्रसिद्ध नाट्य कलाकारही आहेत. त्यांनी हौसी रंगभूमीवर पन्नासहून अधिक विविध भूमिका केलेल्या आहेत. भजनी बाल, पुरुष व महिला पथकांनाही त्यांनी मार्गदर्शन केले आहे व करीत आहेत.गोवा कला व संस्कृती संचालनालयाने ‘कला गौरव’ पुरस्कार प्रदान करून त्यांचा यथोचित गौरव केला आहे. अनेक संस्थांनी त्यांचे सत्कार सोहळे घडवून आणले आहेत.एक प्रथितयश ज्येष्ठ भजनी कलाकार, हौशी नाट्य कलाकार, विख्यात मृदंगवादक व लोकप्रिय भजनी मार्गदर्शक म्हणून ते परिचित आहेत. शिक्षक विकास परिषदेने ‘राष्ट्रीय भजन भूषण’ पुरस्काराने त्यांना यथोचित सन्मानित केले आहे.