हॅलो 1 : विद्यमान नगरसेवकांची पत्नीसाठी फिल्डींग

By Admin | Updated: August 28, 2015 23:37 IST2015-08-28T23:37:11+5:302015-08-28T23:37:11+5:30

कुडचडे-काकोडा पालिका

Hello 1: Filing for existing corporators wife | हॅलो 1 : विद्यमान नगरसेवकांची पत्नीसाठी फिल्डींग

हॅलो 1 : विद्यमान नगरसेवकांची पत्नीसाठी फिल्डींग

डचडे-काकोडा पालिका
सावर्डे : आनंद मंगेश नायक
नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होताच कुडचडे-काकोडा पालिका क्षेत्रातील इच्छुकांची धावपळ सुरु झाली आह़े अनेकांनी मतदारांच्या भेटीगाठीवरभर दिला आह़े त्यातच विद्यमान बाराही नगरसेवक पुन्हा निवडणुकीत उतरण्याची शक्यता असली तरी जे मतदारसंघ महिलांसाठी राखीव होतील, तेथे आपल्या पत्नीची वर्णी लावण्याची तयारी चालविलेली आहे.
कुडचडे ही दक्षिण गोव्यातील एक प्रमुख नगरपालिका मानली जाते. मडगाव व मुरगाव पालिकेपाठोपाठ कुडचडे-काकोडा पालकेचा क्रमांक लागतो. सध्याच्या 12 प्रभागांचे 14 प्रभाग करण्यास सरकारने तत्त्वता मान्यता दिलेली असली तरी 14 ऐवजी 15 प्रभाग करावे, अशी जोरदार तयारीही चालल्याचे समजते. अद्याप प्रभागांची आखणी झालेली नाही. त्याचप्रमाणे महिलांसाठी इतर मागासवर्गियांसाठी व इतरांसाठी राखीव प्रभाग किती असतील व ते कोणते हे अद्याप जाहीर झाले नसले तरी याकडे लक्ष देऊन काही इच्छुक उमेदवार आहेत. ते राखीवतेचे प्रभाग पक्के झाल्यावर कोणत्या प्रभागात कोण उभे राहाणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. सध्याच्या पालिका मंडळाच्या काळात पाच वर्षांत पाच नगराध्यक्ष झाले. ही पालिका नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव असलेली. त्यामुळे पालिकेतील सर्वच महिलांनी काही काळ एकमेकांच्या सहकार्याने नगराध्यक्षपद भूषविलेले आहे. मात्र एकाही नगराध्यक्षाच्या काळात डोळ्य़ात भरण्यासारखे प्रकल्प उभे राहिलेले नाहीत. या काळात पालिकेच्या बैठका मात्र बर्‍याच वादळी झालेल्या आहेत.
कुडचडे-काकोडा नगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. पालिकेच्या कर्मचार्‍यांना वेळेवर पगार देणेही पालिकेला शक्य होत नाही. तसेच पाहता पालिकेची सर्व प्रकारच्या कर, भाडे, परवाने, घरप?ी याद्वारे येणारी रक्कम सुमारे 60 ते 70 लाखांच्या घरात पोहोचलेली आहे. मात्र ती वसूल करण्यासाठी कडक पावले उचलली जात नाहीत. प्रत्येक महिन्याला 13 लाख फक्त पगारावर खर्च होतात. मात्र थकबाकी असूनही ते वसुलीबाबत कर्मचारी आस्था दाखवत नाहीत. प्रत्येक बैठकीत हा मुद्दा जेव्हा चर्चेत येतो, त्यावेळी नगरसेवक मुख्याधिकार्‍यांवर खापर फोडीत असतात. ते कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करीत नसल्यानेच ते कामचुकारपणा करतात, असे नगरसेवकांचे म्हणणे असते. मात्र मुख्याधिकारी आग्नेला फर्नांडिस यांच्या मते आपण कोणतीही कारवाई करण्याची पावले उचलली तर कामगार राजकीय वजन वापरतात. त्यामुळे आपणास कारवाई करण्यास आडकाठी येत असल्याचे ते सांगतात.
सध्याच्या पालिका मंडळातील बाराही नगरसेवकांमध्ये विशेष अशी कामगिरी दिसून आलेली नसली तरी फक्त पुष्कल सावंत या एकाच नगरसेवकाने प्रत्येक वेळी आपली छाप दाखवून दिली. एखाद्या प्रकरणातील निर्णय आवडला नसल्यास त्यांनी सदैव त्याला उघडपणे विरोध केलेला आहे. त्यामुळे पालिकेत ते एकमेव विरोधी नगरसेवक असल्याचे जाणवत आहे.
सध्याच्या बारापैकी बाबुराव फ?ो देसाई हे सर्वात ज्येष्ठ व अनुभवी नगरसेवक आहेत. ते चारवेळा पालिकेवर निवडून आलेले आहेत व त्यांनी नगराध्यक्षपदही भूषविलेले आहे. त्यांची पत्नीही नगरसेवक म्हणून निवडून आली होती. त्याचप्रमाणे त्यांच्या पाठोपाठ प्रदीप नाईक हे दोनवेळा निवडून आलेले आहेत. मात्र अनिता नाईक या पहिल्यांदाच असल्या तरी मागच्या मंडळात त्यांचे पती नगरसेवक होते. पेट्रोसिया फर्नांडिस याही प्रथमच मात्र त्यांच्या सासू व दीर यापूर्वी निवडून आले होते. रोशा पेरैरा यांची पत्नी तर आलिफा फर्नांडिस यांचे पती नगरसेवक राहिलेले आहेत. पुष्कल सावंत यांचे वडील नगरसेवक होते. आनंद प्रभुदेसाई, कार्मेलिन फर्नांडिस, गुणा नाईक, जास्मीन ब्रागांझा व र्शीकांत गावकर यांचे कोणीही यापूर्वी पालिकेत निवडून आले नव्हते. त्यामुळे त्यांना कोणताच राजकीय पूर्वेतिहास नाही. हे नवके नगरसेवक असले तरी त्यांनी फक्त डॉ. जास्मीन ब्रागांझा यांनीच आपला प्रभाग चांगल्या प्रकारे विकासकामे करून वाहव्वा मिळविलेली आहे.
सध्याचे सर्व नगरसेवक पुन्हा निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहेत. मात्र ते प्रभागांच्या अरक्षणांवर अवलंबून आहे. आपला प्रभाग राखीव जाला व परत आपणास निवडणुकीत आपल्या प्रभागात उमेदवारी दाखल करता मिळाली नाही तर त्यांनी आपली पत्नी अथवा नातेवाईक अथवा आपल्या विश्वासातील एखाद्याला निवडणुकीत उतरविण्याची तयारी चालविल्याचे समजते. त्यात सध्याच्या नगराध्यक्षा अनिता नाईक यांच्या प्रभागात त्यांचे पती मारुती नाईक (माजी नगराध्यक्ष), उपनगराध्यक्ष प्रदीप नाईक हे त्यांची पत्नी माजी उपनगराध्यक्षा पशिला नाईक, गुणा नाईक यांनी अपली पत्नी, पेट्रिसिया फर्नांडिस यांचे पतनी बट्रॉड फर्नांडिस, कार्मेलीन फर्नांडिस यांचे पती अगुस्तीन फर्नांडिस, अनंद प्रभुदेसाई यांनी अपली पत्नी, बाबुराव फ?ो देसाई यांनी अपली पत्नी रुक्मिणी फ?ो देसाई अश प्रकारे तयारी केलेली असली तरी कोण रिंगणात उतरतो हे अरक्षण जाहीर झाल्यावरच स्पष्ट होणार अहे.
सध्या तीन वाढीव प्रभाग होत असून बहुदा ते कुडचडे बाजारातील प्रभाग, पोंगीर व्हाळ-काकोडा व घोटमरड या तीन विभागांचे विभाजन होऊन हे प्रभाग होणार अहेत, असे खात्रीलायक समजते. मात्र या तिन्ही नव्या प्रभागात बाळकृष्ण होडारकर, सुशंत देसाई व विश्वास देसाई हे नवीन उमेदवार बाशिंग बांधून आहेत. ते भाजपाचे सर्मथक मानले जात असून आमदार नीलेश काब्राल यांच्यामार्फत त्यांनी त्या भागात लोकांची कामे करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते. कुडचडे बाजारातील प्रभाग रोश पेरैरा यांचा, घोटमरड बाणसाय प्रभाग बाबुराव फ?ो देसाई व पोंगीरव्हाळ प्रभाग पुष्कल सावंत यांचे आहेत. हे तिन्ही नगरसेवक विरोधी मानले जातात. त्यामुळे त्यांचे प्रभाग फोडून भाजपाने त्यांचा पाडाव करण्यासाठी ही खेळी खेळण्याचा डाव रचला असल्याची प्रतिक्रिया लोक व्यक्त करीत असले तरी निवडणुकीत कोणाचा प्रभाव कोठे आहे हे दिसून येणार आहे.
पालिका निवडणुका पक्ष पातळीवर लढविल्या जाणार नसल्या तरी भाजपातर्फे एक पॅनल उभे करण्यात येणार हे निश्चित आहे. मात्र त्यात कोणाची वर्णी लागेल हे आताच सांगणे कठीण आहे. मात्र सध्याचे आमदार नीलेश काब्राल हेही पालिका आपल्या ताब्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणार आहेत. एकंदर परिस्थिती पाहता या पालिकेत भाजपालाच जास्त अनुकूलता आहे. विरोधी काँग्रेस पक्षाचे या भागात कार्य नसल्याने ते पॅनल उभे करण्याची शक्यता कमीच असल्याचे दिसून येते.

Web Title: Hello 1: Filing for existing corporators wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.