शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरच्या पटनी टॉपमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले; दोन पायलट जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 14:18 IST

Helipcoter crash in udhampur district of jammu kashmir : उधमपूरमध्ये पटनी टॉप भागाजवळ हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाच्या टीम बचावकार्यासाठी दाखल झाल्या आहेत.

नवी दिल्ली - जम्मू -काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराचं एक हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये दोन पायलट जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. एएनआयने भारतीय लष्कराच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उधमपूरमध्ये पटनी टॉप भागाजवळ हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाच्या टीम बचावकार्यासाठी दाखल झाल्या आहेत.

उधमपूरचे पोलीस उपमहानिरीक्षक सुलेमान चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना हेलिकॉप्टर कोसळ्याची माहिती मिळाली आणि शिवगड धारमध्ये घटनास्थळाकडे पथके रवाना करण्यात आली आहेत. या भागात धुक्याचं प्रमाण जास्त असल्याने दृश्यमानता कमी झाली आहे असंही त्यांनी सांगितलं. बचाव पथकांनी घटनास्थळी पोहोचून दोन जखमी पायलटना बाहेर काढण्यात यश मिळवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पटनी टॉपच्या वरच्या शिवगड धार भागातील ग्रीनटॉप हॉटेलजवळ डोंगराळ भागात हे हेलिकॉप्टर कोसळलं. नागरिकांकडून या घटनेची सूचना मिळाल्यानंतर तातडीनं सैन्य अधिकारी आणि जवान घटनास्थळी मदतीसाठी दाखल झाल्याची माहिती लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. या दुर्घटनेत मुख्य पायलट आणि सहकारी पायलट गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतIndian Armyभारतीय जवानHelicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटना