A helicopter force-lands in Kathua, Jammu and Kashmir - PRO Defence, Jammu | जम्मू-काश्मीरच्या लखनपूरमध्ये लष्काराचे हेलिकॉप्टर क्रॅश, दोन जवान गंभीर जखमी

जम्मू-काश्मीरच्या लखनपूरमध्ये लष्काराचे हेलिकॉप्टर क्रॅश, दोन जवान गंभीर जखमी

जम्मू -काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील लखनपूर परिसरात भारतीय लष्कराचे ध्रुव हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. या दुर्घटनेत लष्काराचे दोन जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.  या दोन्ही जवानांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, कठुआ जिल्ह्यातील लखनपूर परिसरात जम्मू-काश्मीर-पंजाब सीमेजवळ भारतीय लष्काराचे ध्रुव ALH हे हेलिकॉप्टरचे टेक ऑफ करताना कोसळले. या घटनेला कठुआचे पोलीस अधीक्षक शैलेंद्र कुमार मिश्रा यांनी दुजोरा दिला आहे. 

शैलेंद्र कुमार मिश्रा यांनी हेलिकॉप्टर दुर्घटनेबाबत सांगितले सी, लखनपूरच्या जवळ भारतीय लष्कराचे ध्रुव हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. या दुर्घटनेत 2 पायलट जखमी झाले आहेत. जखमींना पठाणकोटच्या मिल्ट्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: A helicopter force-lands in Kathua, Jammu and Kashmir - PRO Defence, Jammu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.