शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

केरळमध्ये महापूर पण उर्वरित दक्षिण भारत दुष्काळाच्या छायेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 16:24 IST

केरळमध्ये पुरस्थिती आली असताना दुसरीकडे उर्वरित दक्षिण भारत मात्र दुष्काळाच्या छायेत आहे.

तिरुवनंतपुरम - केरळमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे गेल्या शंभर वर्षातील सर्वात भीषण महापुराचा सामना केरळला करावा लागला आहे.  केरळमध्ये पुरस्थिती आली असताना दुसरीकडे उर्वरित दक्षिण भारत मात्र दुष्काळाच्या छायेत आहे. केरळ आणि आंध्र प्रदेशचा काही भाग वगळता उर्वरित दक्षिण भारताला दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगाणा आणि रायलसीमा या भागातील 95 जिल्ह्यांपैकी  47 जिल्ह्यात यावेळी सरासरीच्या सुमारे 20 टक्क्यांपर्यंत कमी पाऊस झाला आहे. तर पाच जिल्ह्यांमध्ये 60 टक्क्यांहून कमी पाऊस झाला आहे. या संपूर्ण भागात मिळून सरासरीपेक्षा  42 टक्क्यांपर्यंत कमी पाऊस झाला आहे. हे प्रमाण पश्चिम राजस्थानपेक्षाही कमी आहे.  तामिळनाडूतील 32 पैकी 22 जिल्ह्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर कर्नाटकच्या अंतर्गत भागातही 21 टक्क्यांपर्यंत कमी पाऊस झाला आहे. याउलट केरळच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. कर्नाटकमध्ये पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधिक दिसत असले तरी राज्यातील निम्म्या जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस पडला आहे. कर्नाटकमधील कोडगूसह 15 जिल्ह्यात अधिक पाऊस पडला आहे. तर 15 जिल्ह्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला आहे.  तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशमध्ये मात्र पर्जन्यमान चांगले झाले आहे. तेलंगाणातील 31 पैकी केवळ 6 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर आंध्र प्रदेशच्या किनारी जिह्ल्यांमध्येही सरासरीपेक्षा 21 टक्के अधिक पाऊस झाला आहे. केरळमध्ये सरासरी पेक्षा 40 टक्के अधिक पाऊस झाला आहे. तर मध्य भारतात गुजरात वगळता अन्यत्र सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस झाला आहे. संपूर्ण देशात मिळून सरासरीपेक्षा 7 टक्के कमी पाऊस पडला आहे.  

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018RainपाऊसKeralaकेरळfloodपूरdroughtदुष्काळ