शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Heavy Rain In Benglore : पावसाचा हाहाकार! बेंगळुरूच्या IT कंपन्यांना बसला 225 कोटी रुपयांचा फटका, अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 06:28 IST

या पावसामुळे बेंगळुरूतील अनेक आयटी कंपण्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.

कर्नाटकचे आईटी हब असलेले बेंगळुरू सध्या पावसाचा सामना करत आहे. सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नाले ओव्हरफ्लो झाले असून अनेक ठिकाणी गाड्याही अडकल्या आहेत. या पावसामुळे बेंगळुरूतील अनेक आयटी कंपण्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. महत्वाचे म्हणजे, या शहरात गूगल, अडोब आणि इंफोसिस सारख्या मोठ मोठ्या आयटी कंपन्या आहेत.

IT कंपन्यांना मोठा झटका -पावसामुळे येथील आयटी कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एका आकडेवारीनुसार, या IT कंपन्यांकडून सरकारला सुमारे 64 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो. हा आकडा साधारणपणे कर्नाटकच्या GDP च्या 25 टक्के एवढा आहे. या कंपन्यांमुळेच इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटकातील लोकांचे सरासरी उत्पन्न अधिक आहेत. मात्र, आता कर्नाटकातील पावसामुळे याच आयटी कंपन्यांना 225 कोटी रुपयांचा फटका सबला आहे. पावसामुळे येथील लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणेही आवघड होत आहे.बेलांदूर, सरजापुरा रोड, व्हाइटफील्ड, आउटर रिंग रोडला पावसाचा सर्वाधिक फटका - कर्नाटकातील पावसाचे जे फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत, त्यांत गाड्यांपेक्षा अधिक जेसीबी दिसत आहेत आणि ऑटोची जागा ट्रॅक्टरने घेतल्याचे दृष्य आहे. लोक ट्रॅक्टनेच ऑफिसात जाताना दिसत आहेत. सध्या पावसाचा सर्वाधिक फटका बेलांदूर, सरजापुरा रोड, व्हाइटफील्ड, आउटर रिंग रोड आणि BEML लेआउटला बसला आहे. यापूर्वी, 30 ऑगस्टला शहरात मुसळधार पाऊस झाला होता. तेव्हाही अशीच स्थिती निर्माण झाली होती. तसेच, 9 सप्टेंबरपर्यंत कर्नाटकात पाऊस सुरूच राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

टॅग्स :RainपाऊसBengaluruबेंगळूरITमाहिती तंत्रज्ञानKarnatakकर्नाटक