दिल्लीहून लेहच्या दिशेने झेपावलेल्या स्पाइसजेटच्या विमानात आज सकाळी उड्डाणानंतर काही वेळातच मृत्यूचा थरार पाहायला मिळाला. विमानाने हवेत झेप घेताच प्रवाशांना खिडकीबाहेर इंजिनमधून आगीच्या ज्वाळा आणि ठिणग्या दिसू लागल्या. या भयानक दृश्यामुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान तातडीने पुन्हा दिल्ली विमानतळाच्या दिशेने वळवले आणि सुरक्षित लँडिंग केले. या मोठ्या संकटामुळे प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले आहेत.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
नेमकं काय घडलं?
स्पाइसजेटचे हे विमान दिल्लीहून लेहसाठी नियोजित वेळेवर निघाले होते. विमानाने धावपट्टीवरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच विमानातील तांत्रिक बिघाड समोर आला. 'क्लाईम्ब' अर्थात विमान उंची गाठत असतानाच्या दरम्यान विमानाचे दुसरे इंजिन निकामी झाल्याची शंका येत आहे. यावेळी इंजिनमधून ठिणग्या बाहेर पडताना दिसल्या, ज्यामुळे विमानातील प्रवाशांच्या मनात धडकी भरली.
प्रवाशांचा जीव टांगणीला
विमानात आग दिसताच प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. अनेकांना विमानाचा भीषण अपघात होईल अशी भीती वाटू लागली. मात्र, क्रू मेंबर्सनी प्रवाशांना धीर देण्याचा प्रयत्न केला. विमानातील या तांत्रिक बिघाडाची माहिती मिळताच दिल्ली विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आणि तातडीने आपत्कालीन लँडिंगची तयारी करण्यात आली.
सुदैवाने, वैमानिकाच्या कौशल्यामुळे विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरवण्यात आले. विमानात नेमके किती प्रवासी होते, याची अधिकृत आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. मात्र, सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून त्यांची विमानतळावरच व्यवस्था करण्यात आली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नागरी विमान वाहतूक संचालनालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तांत्रिक बिघाड नक्की कशामुळे झाला, याचे नेमके कारण सविस्तर तपासानंतरच स्पष्ट होईल.
Web Summary : A SpiceJet flight from Delhi to Leh experienced engine trouble shortly after takeoff. Passengers saw flames, causing panic. The pilot safely returned to Delhi for an emergency landing, averting a major disaster. An investigation has been ordered.
Web Summary : दिल्ली से लेह जा रही स्पाइसजेट की उड़ान में उड़ान भरने के तुरंत बाद इंजन में खराबी आ गई। यात्रियों ने आग की लपटें देखीं, जिससे दहशत फैल गई। पायलट ने सुरक्षित रूप से दिल्ली में इमरजेंसी लैंडिंग की, जिससे एक बड़ा हादसा टल गया। जांच के आदेश दिए गए हैं।