केजरीवालांच्या सुटकेवर आज सुनावणी

By Admin | Updated: May 27, 2014 05:53 IST2014-05-27T05:53:40+5:302014-05-27T05:53:40+5:30

आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांची तिहार कारागृहातून तात्काळ सुटका करण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर सुनावणी करण्यास दिल्ली उच्च न्यायालय राजी झाले आहे

Hearing today on the release of Kejriwal | केजरीवालांच्या सुटकेवर आज सुनावणी

केजरीवालांच्या सुटकेवर आज सुनावणी

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांची तिहार कारागृहातून तात्काळ सुटका करण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर सुनावणी करण्यास दिल्ली उच्च न्यायालय राजी झाले आहे. नितीन गडकरी अवमानप्रकरणी जामीन घेण्यास नकार दिल्यानंतर केजरीवाल यांना न्यायालयाने तुरुंगात पाठविले होते. मंगळवारी सुनावणी होणार आहे. केजरीवालांना कायद्याची चुकीची व्याख्या करून कोठडीत पाठविले असल्याचे याचिकेत म्हटले आहे. अ‍ॅड. प्रशांत भूषण यांनी न्या. बी.डी. अहमद व न्या. एस. मृदुल यांच्या पीठासमक्ष याचिका दाखल केली होती. जामीन मुचलक्याची रक्कम भरण्यास नकार दिल्यामुळे न्यायालयाने केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचा आदेश दिला होता. केजरीवालांना कोठडीत पाठविण्याची आवश्यकता नव्हती आणि त्यांना लेखी प्रतिज्ञापत्र सादर करण्याची परवानगी द्यायला हवी होती, असे या याचिकेत म्हटले आहे. केजरीवालांविरुद्धचा हा मानहानीचा खटला भाजप नेते नितीन गडकरी यांनी दाखल केला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Hearing today on the release of Kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.