शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाच्या आशा पल्लवित; ‘क्युरेटिव्ह’वर २४ जानेवारीला सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2023 05:49 IST

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या कक्षात होणार निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली ( Marathi News ):  मराठा आरक्षणावर महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर २४ जानेवारी रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. ६ डिसेंबर रोजी ही याचिका सरन्यायाधीशांच्या कक्षात झालेल्या सुनावणीदरम्यान विचारात घेण्यात आली होती. पण त्यावर कोणताही निर्णय झाला नव्हता.  

महाराष्ट्र शासनाविरुद्ध जयश्री पाटील आणि विनोद पाटील विरुद्ध जयश्री पाटील प्रकरणातील दोन क्युरेटिव्ह याचिका एकत्र करून ६ डिसेंबर रोजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या कक्षात न्या. संजय किशन कौल, न्या. संजीव खन्ना आणि न्या. भूषण गवई यांच्या निर्णयार्थ ठेवण्यात आल्या होत्या.

क्युरेटिव्ह याचिकेवरील न्यायमूर्तींच्या कक्षात होणाऱ्या सुनावणीत याचिका फेटाळण्याचा, नोटीस बजावण्याचा किंवा खुल्या न्यायालयात सुनावणी करण्याचे पर्याय असतात. यापैकी कोणत्याही पर्यायाचा अवलंब करण्यात आलेला नाही. न्या. संजय किशन कौल निवृत्त झाल्यामुळे या क्युरेटिव्ह याचिकेवर नव्याने सुनावणी होणार आहे. २४ जानेवारी रोजी सरन्यायाधीशांच्या कक्षात सुनावणी होऊन त्यावर निर्णय घेतला जाईल. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMaratha Reservationमराठा आरक्षण