‘इंडियाज डॉटर’वर आज सुनावणी
By Admin | Updated: March 12, 2015 00:02 IST2015-03-12T00:02:03+5:302015-03-12T00:02:03+5:30
निर्भया बलात्कार प्रकणातील आरोपीच्या मुलाखतीवर आधारित बीबीसीच्या वादग्रस्त माहितीपटावर आणलेली बंदी उठविण्याची

‘इंडियाज डॉटर’वर आज सुनावणी
नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकणातील आरोपीच्या मुलाखतीवर आधारित बीबीसीच्या वादग्रस्त माहितीपटावर आणलेली बंदी उठविण्याची विनंती करणाऱ्या जनहित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालय गुरुवारी सुनावणी करणार आहे.
गृहमंत्रालय तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीच्या प्रसारणावर आणलेली बंदी बेकायदा असल्याचे सांगत तातडीने सुनावणी करण्याची विनंती विभोर आनंद, अरुण मेनन व कृतिका पडोळे या दिल्लीतील विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या याचिकांमधून केली आहे. घटनेच्या कलम १९ नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले असून केंद्र सरकारने बंदी आणून या अधिकारावर घाला घातला आहे, असे याचिकाकर्त्यांनी नमूद केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)