शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

डेंग्यू रोखण्यासाठी कृती आराखडा आरोग्य-वैद्यकीय विभागाची बैठक : दक्षता पथक स्थापनेचे महापौरांचे आदेश

By admin | Updated: July 10, 2015 00:33 IST

नाशिक (दि.९) : शहरात डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढण्यास सुरुवात केल्यानंतर महापौर अशोक मुर्तडक यांनी तातडीने महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाची बैठक बोलावत डेंग्यू रोखण्यासाठी तीन दिवसांत कृती आराखडा सादर करण्याचे आदेश दिले. याशिवाय घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याबरोबरच लोकप्रबोधन करण्याच्याही सूचना महापौरांनी दिल्या.

नाशिक (दि.९) : शहरात डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढण्यास सुरुवात केल्यानंतर महापौर अशोक मुर्तडक यांनी तातडीने महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाची बैठक बोलावत डेंग्यू रोखण्यासाठी तीन दिवसांत कृती आराखडा सादर करण्याचे आदेश दिले. याशिवाय घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याबरोबरच लोकप्रबोधन करण्याच्याही सूचना महापौरांनी दिल्या. शहरात आठवडाभरात डेंग्यूचे सात संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्याने महापालिकेची यंत्रणा सतर्क करण्यासाठी महापौर अशोक मुर्तडक यांनी आरोग्य व वैद्यकीय विभागातील अधिकारी, स्वच्छता निरीक्षक यांची तातडीची बैठक स्थायी समितीच्या सभागृहात बोलाविली होती. बैठकीला उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समितीचे सभापती शिवाजी चुंभळे, अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे, नगरसेवक प्रा. कुणाल वाघ, यशवंत निकुळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. आर. गायकवाड, आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे, डॉ. सुनील बुकाणे आदि उपस्थित होते. यावेळी डॉ. गायकवाड यांनी शहरात जानेवारी ते जुलै या दरम्यान मलेरियाचे २३, तर डेंग्यूचे १७ रुग्ण दाखल होऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतर महापौर अशोक मुर्तडक यांनी सांगितले की, डेंग्यूचा फैलाव होण्यापूर्वीच उपाययोजना होणे अत्यंत गरजेचे आहे. आरोग्य व वैद्यकीय विभागाने काय उपाययोजना केल्या पाहिजेत, याबाबतचा कृती आराखडा तयार करून तो तीन दिवसांत सादर करावा. याशिवाय दर आठवड्याला अहवाल सादर करावा. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय साधत डेंग्यूला रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. दक्षता पथक स्थापन करावे आणि घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याबरोबरच स्टीकर्स, पत्रके या माध्यमातून जनजागृती करण्याचीही सूचना महापौरांनी केली. उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी सांगितले की, सिंहस्थाचे मोठे आव्हान समोर असताना त्यात डेंग्यूसारख्या आजारांचा सामना करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. आरोग्य व वैद्यकीय विभागातील कर्मचार्‍यांनी प्रत्येक भागात जाऊन लोकांचे प्रबोधन करावे. टायर्स, मनीप्लॅँट, पाण्याच्या टाक्या याबाबत स्वच्छता ठेवण्याचे आवाहन करण्याचीही सूचना बग्गा यांनी केली. शिवाजी चुंभळे यांनी पत्रके वाटण्यापेक्षा माहितीपर स्टीकर्स दरवाजांवर चिकटविल्यास ते कायमस्वरूपी नागरिकांच्या समोर राहील, अशी सूचना केली. प्रा. कुणाल वाघ यांनी रक्तनमुने तपासणीसाठी महापालिकेकडे यंत्रणाच उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी स्वच्छता निरीक्षकांनीही येणार्‍या अडचणी मांडल्या. इन्फोसिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने स्वच्छतेसाठी सुमारे ३३०० कर्मचारी आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून भरण्याचे ठरविले आहे आणि त्यादृष्टीने कार्यवाहीही सुरू आहे. महापालिकेच्या कर्मचार्‍यांबरोबरच संबंधित ठेकेदाराच्या कर्मचार्‍यांचाही उपयोग डेंग्यूविषयक उपाययोजना, सर्वेक्षण, जनप्रबोधनासाठी करून घेण्याची सूचना उपमहापौरांनी केली. फोटो-महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाच्या बैठकीत बोलताना महापौर अशोक मुर्तडक. समवेत नगरसेवक यशवंत निकुळे, उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे, अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे, नगरसेवक प्रा. कुणाल वाघ.