शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
4
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
5
अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
6
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
7
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
8
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
9
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
10
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
11
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
12
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
13
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
14
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
15
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
16
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
17
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
18
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
19
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
20
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

डोकं मोठं असल्याने हेल्मेटच बसत नाही, पोलिसांनी दंड आकारायचा का नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 10:59 IST

झाकीर हा फळविक्रेता असून त्यांच डोकं आकाराने मोठं आहे.

वडोदरा - गुजरात सरकारने मोटार वाहन कायद्यात बदल करत अनेक नियमांच्या दंडांची रक्कम कमी केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मोटार वाहन कायद्यात बदल करण्यात येत असल्याची माहिती दिली. या नवीन बदलानुसार दंडाची रक्कम 50 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. मात्र, पूर्वीच्या आणि नवीन नियमानुसार पोलिसांची कारवाई सुरूच आहे. त्यानुसार, विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या वाहनचालकांकडूनही दंड आकारण्यात येत आहे. 

गुजरातमध्ये विना हेल्मेटने प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारास 1 हजार रुपयांऐवजी 500 रुपये दंड करण्यात येत आहे. मात्र, येथील झाकीर मेमन नावाच्या व्यक्तीकडून दंड घ्यावा की नाही? असा यक्षप्रश्न गुजरात पोलिसांन पडला आहे. कारण, झाकीर यांच्या डोक्याचा आकार हेल्मेटपेक्षा मोठा आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्याच्या आकाराचे हेल्मेट बाजारात उपलब्ध नसल्याचे झाकीर यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर, पोलिसांनाही या समस्येवर तोडगा कसा काढायचा हेच कळेना. याबाबत बोलताना झाकीर म्हणतो की, मी कायदाचा आदर राखतो आणि नियमही पाळतो. हेल्मेटसाठी मी अनेक दुकानांमध्ये गेलो पण ते मिळालं नाही. गाडीची आवश्यक ती कागदपत्रं जवळ बाळगतो पण हेल्मेट नसतं. मी काहीच करू शकत नाही. 

झाकीर हा फळविक्रेता असून त्यांच डोकं आकाराने मोठं आहे. त्याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांनाही चिंता असते. दुचाकीवरुन घराबाहेर पडल्यानंतर त्याला नेहमीच सोबत जास्त पैसे बाळगावे लागतात. कारण, वाहतूक पोलिसांच्या भितीने त्यांना नेहमी पैशाची गरज भासते. बहुतांशवेळी वाहतूक पोलीस हे कारण ऐकून घेत नाहीत. त्यामुळे झाकीर यांना दंड भरावाच लागतो. झाकीर यांच्या समस्येबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत राठवा यांनी सांगितलं की, झाकीरची समस्या खरी आहे. त्याच्याकडे कोणताच पर्याय नाही. त्यामुळं दंडही करता येत नाही. हेल्मेट वगळता तो सर्व नियमांचे पालन कतो. दरम्यान, केंद्र सरकारनं राबवलेल्या मोटार वाहन कायद्याला राज्यात तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली आहे. मोटार वाहन कायद्यासंदर्भात केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यानुसार नवीन मोटार वाहन कायद्याला राज्यात तूर्तास स्थगिती दिल्याचं दिवाकर रावतेंनी जाहीर केलं आहे. या कायद्यासंदर्भात राज्यानं कोणतीही भूमिका घेतलेली नाही. या कायद्याच्या बाबतीत राज्य सरकार तटस्थ आहे. यासंदर्भामध्ये आम्ही जोपर्यंत नोटिफिकेशन काढत नाही, तोपर्यंत या कायद्याची राज्यात अंमलबजावणी होणार नाही. तरीही अशा प्रकारे कोणी दंडवसुली करत असल्यास वाहन चालक कोर्टात जाऊ शकतात, असं रावतेंनी सांगितलं आहे. 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसvadodara-pcवडोदराTrafficवाहतूक कोंडीbikeबाईक