पाकला दहशतवादी देश जाहीर करण्यासाठी त्याने रक्ताने लिहले पत्र
By Admin | Updated: October 2, 2016 15:13 IST2016-10-02T15:13:46+5:302016-10-02T15:13:46+5:30
दहशतवादयांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला दहशतावादी देश जाहीर करण्यात यावे, या मागणीसाठी चक्क रक्ताने पत्र लिहण्यात आले आहे.

पाकला दहशतवादी देश जाहीर करण्यासाठी त्याने रक्ताने लिहले पत्र
ऑनलाइन लोकमत
धरमशाळा, दि. २ - दहशतवादयांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला दहशतावादी देश जाहीर करण्यात यावे, या मागणीसाठी चक्क रक्ताने पत्र लिहण्यात आले आहे. भारतावर सतत होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याला जनता देखिल कंटाळी आहे. यामळुचं धरमशाळा येथील कार्यकर्ते डॉ. महेश यादव यांनी आपल्या रक्ताने संयुक्त राष्ट्राच्या सचिवांना पत्र लिहिले आहे.
यादव यांनी संयुक्त राष्ट्राचे सचिव बान की-मून यांना स्वत:च्या रक्ताने हिंदीमध्ये पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी पाकला दहशतवादी देश जाहीर करण्याची मागणी केली आहे. दरम्यान पाकव्याप्त काश्मिरमधील कोटली येथील स्थानिकांनी आज सकाळी पाकिस्तानचे लष्कर आणि आयएसआय करत असलेल्या अत्याचारांविरुद्ध रस्त्यावर येऊन निदर्शने केली आहेत.
Himachal:Activist in Dharamsala Dr. Mahesh Yadav writes in blood to UN Secy-General Ban Ki-moon asking to declare Pakistan a terrorist state pic.twitter.com/OycUkkdiwl
— ANI (@ANI_news) October 2, 2016