परदेशातून सोनं लपवून तस्करी करत होता, कस्टम अधिकाऱ्यांनी तपासणी केली; ठेवण्याची जागा पाहून अनेकांना धक्काच बसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 17:46 IST2025-01-24T17:31:22+5:302025-01-24T17:46:21+5:30
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर निव्हिया क्रीमच्या बॉक्स आणि टायगर बामच्या बाटल्यांमध्ये लपवलेले २३.७६ लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे.

परदेशातून सोनं लपवून तस्करी करत होता, कस्टम अधिकाऱ्यांनी तपासणी केली; ठेवण्याची जागा पाहून अनेकांना धक्काच बसला
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून एका प्रवाशाने सोनं तस्करी करुन आणल्याची घटना समोर आली. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. या आरोपीची तपासणी केली तेव्हा काहीच सापडले नाही. पण, जेव्हा त्याच्या जवळ असणाऱ्या वस्तुंची तपासणी केली तेव्हा अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. निव्हिया क्रीमच्या बॉक्स आणि टायगर बामच्या बाटल्यांमध्ये लपवलेले २३.७६ लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे.
'आम्ही गुलामासारखे उभे राहावे, अशी त्यांची अपेक्षा', निलंबनानंतर खासदार अरविंद सावंत संतापले
२१ जानेवारी रोजी रियाध येथून आल्यानंतर एका भारतीय नागरिकाला संशयावरून थांबवण्यात आले आणि त्याची झडती घेण्यात आली. सामानाची पूर्ण तपासणी आणि प्रवाशाची वैयक्तिक झडती घेतल्यावर सोन्यापासून बनवलेल्या रेनियम-लेपित पट्ट्यांचे १८ तुकडे जप्त करण्यात आले, यांचे वजन एकूण ३१८ ग्रॅम होते. हे ४ निव्हिया क्रीम बॉक्स आणि १० टायगर बाम बाटल्यांमध्ये लपवून ठेवण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले. या सर्व वस्तुंची किंमत २३ लाख ७६ हजार ४७१ रुपये असल्याचे सांगण्यात आले.
काही दिवसापूर्वी मुंबई विमानतळावरही सोन्याची तस्करी प्रकरण समोर आले होते. तस्करी करणाऱ्या चौघांना महसूल गुप्तचर संचालनालयाने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून शुक्रवारी अटक केली. या आरोपींकडून ४ कोटी ८४ लाखांचे सोने जप्त करण्यात आले आहे. या सोन्याची तस्करी करण्याआधीच आरोपींना पकडण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ड्युटी फ्री एअर शॉपमध्ये काम करणाऱ्या विमानतळ कर्मचाऱ्यांचा एक गट सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती संचालनालयाला मिळाली होती.