शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Jamia Firing: 'तो विद्यार्थी नथुराम गोडसेसारखाच, त्याचा सत्कार करणार!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 17:41 IST

हिंदू महासभेकडून गोळीबार करणाऱ्या विद्यार्थ्याची स्तुती; संघटनेकडून कायदेशीर मदत दिली जाणार

नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असताना त्यावर गोळी झाडणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याचा हिंदू महासभेकडून सन्मान करण्यात येणार आहे. जामियातील विद्यार्थ्यांवर गोळीबार करणारा विद्यार्थी नथुराम गोडसेंसारखा राष्ट्रवादी असल्याचं हिंदू महासभेनं म्हटलं आहे. हिंदू महासभेला गोळीबार करणाऱ्या विद्यार्थ्याचा अभिमान वाटतो, अशा शब्दांत संघटनेचे प्रवक्ते अशोक पांडेंनी गोळी झाडणाऱ्याचं कौतुक केलं. 'जामियाच्या कॅम्पसमधून देशविरोधी कृत्यं करणाऱ्यांची तोंडं बंद करण्याचा प्रयत्न त्या विद्यार्थ्यानं केला. आम्हाला त्याचा अभिमान वाटतो', अशी स्तुतीसुमनं पांडेंनी उधळली. हिंदू महासभा गोळीबार करणाऱ्या विद्यार्थ्याला संपूर्ण कायदेशीर मदत देणार असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं. 

अशोक पांडेंनी विद्यार्थ्यानं केलेल्या गोळीबाराचं समर्थन केलं. 'त्या विद्यार्थ्यानं राष्ट्रविरोधी लोकांना धडा शिकवण्यासाठी गोळी झाडली. थंड डोक्यानं केलेल्या खुनात आणि देशहितासाठी एखाद्या व्यक्तीची हत्या करण्यात कायदादेखील फरक करतो,' असं धक्कादायक विधान पांडेंनी केलं. अलिगढ मुस्लिम विद्यापीठ कॅम्पस, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, शाहीन बागेत आंदोलनं करणाऱ्या देशद्रोह्यांना गोळ्या घालायला हव्यात, असंदेखील ते पुढे म्हणाले. जामिया मिलिया विद्यापीठात काल विद्यार्थ्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात मोर्चा काढला होता. त्यावेळी एका अल्पवयीन विद्यार्थ्यानं जमावासमोर जाऊन हातातली बंदूक दाखवली. दिल्ली पोलीस झिंदाबाद, जामिया मिलिया मुर्दाबाद अशा घोषणा विद्यार्थ्यानं दिल्या. यावेळी त्यानं बंदुकीतून गोळीदेखील झाडली. त्यात एक विद्यार्थी जखमी झाला. अल्पवयीन विद्यार्थी जमावासमोर बंदूक दाखवत असताना त्याच्या मागे असलेल्या पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.  

टॅग्स :jamia protestजामियाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNathuram Godseनथुराम गोडसे