नऊ दिवस तो राहिला लहान भावाच्या मृतदेहासोबत
By Admin | Updated: July 6, 2017 09:04 IST2017-07-06T08:52:31+5:302017-07-06T09:04:00+5:30
लहान भावाच्या मृत्यूनंतर त्यांचा मोठा भाऊ तब्बल नऊ दिवस त्या मृतदेहासोबत राहिल्याची घटना दिल्लीमध्ये घडली आहे.

नऊ दिवस तो राहिला लहान भावाच्या मृतदेहासोबत
ऑनलाइन लोकमत
सिक्किमप्रश्नी कुटनीतीच्या माध्यमातूनच तोडगा, भारताची स्पष्ट भूमिका
बालविवाहामुळे कुपोषण
दहशतवादाच्या राक्षसाला नष्ट करू
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनंतर 27 जून रोजी राजेंद्र शिक्षक असलेली शाळा सुरू झाली होती. 28 तारखेला राजेंद्र भटनागर शाळेत आले नाहीत म्हणून शाळेतील शिपाई चावी घेण्यासाठी त्यांच्या घरी गेला होता. तेव्हा राजेंद्र बीकानेरला गेले असल्याचं प्रल्हाद यांनी त्या शिपायाला सांगितलं. सोमवारपर्यंत राजेंद्र शाळेत गेले नाहीत म्हणून त्या शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मीचंद तोमर यांनी शाळेच्या नंद कुमार आणि उत्तम कुमार या दोन शिक्षकांना त्यांच्या घरी पाठवलं होतं. शिक्षक जेव्हा राजेंद्र कुमार यांच्या घरी पोहचले तेव्हा त्यांना घरातून विचित्र वास येऊ लागला. ते दोघे जण घरात गेल्यावर त्यांना बिछान्यावर राजेंद्र यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. याप्रकरणी त्या शिक्षकांनी पोलिसांनी माहिती दिली. तेव्हा आपला लहान भाऊ राजेंद्र आजारी असल्याचं प्रल्हाद यांनी पोलिसांना सांगितलं.