शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तिरंग्यासाठी त्याने विकले घरदार, चार वर्षांनी झाले स्वप्न साकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 10:19 IST

आंध्र प्रदेशमधील एका व्यक्तीने तिरंग्यासाठी जे काही केले ते वाचून तुम्हाला त्याचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही.

हैदराबाद - देशाचा राष्ट्रध्वज असलेल्या तिरंग्याबाबत देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात आदराची भावना असते. प्रत्येक जण आपल्यापरीने तिरंग्याचा मान वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतो. मात्र आंध्र प्रदेशमधील एका व्यक्तीने तिरंग्यासाठी जे काही केले ते वाचून तुम्हाला त्याचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. आंध्र प्रदेशमधील आर. सत्यनारायण या व्यक्तीने वैशिष्ट्यपूर्ण तिरंगा साकार करण्यासाठी आपले घर विकले आणि चार वर्षांच्या अथक मेहनतीचे  हा वैशिष्ट्यपूर्ण तिरंगा तयार करण्याचे स्वप्न साकार केले. आंध्र प्रदेशमधील नागरिक असलेले आर. सत्यनारायण यांनी वेगळ्या पद्धतीने तिरंगा साकार करण्याचा निश्चय केला होता. त्यांना एकाच कपड्यामध्ये कुठल्याही पद्धतीची शिलाई नसलेला तिरंगा तयार करायचा होता. अनेक वर्षांपासून मनात असलेला अशाप्रकारचा तिरंगा तयार करण्यासाठी साडे सहा लाख रुपयांची गरज होती. मात्र तेवढी रक्कम त्यांच्याकडे नसल्याने त्यांचे तिरंगा साकारण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यात अडथळे येत होते. अखेरीस सत्यनारायण यांनी आपले घर विकून साडे सहा लाख रुपयांची रक्कम उभी केली. त्यानंतर सुमारे चार वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांच्या मनासारखा तिरंगा साकार झाला. आठ बाय बारा फूट आकाराचा तिरंगा साकारणे हा सत्यनारायण यांच्यासाठी एक वेगळा अनुभव होता. केवळ एका कपड्यावर तयार केलेला एकही तिरंगा नाही. सर्व तिरंगे हे केसरी, पांढरा आणि हिरव्या रंगाच्या कपड्यांनाएकत्र शिवून तयार केले जातात, असे सत्यनारायण सांगतात. आता हा तिरंगा लाल किल्ल्यावर फडकवण्यात यावा अशी इच्छा सत्यनारायण यांनी व्यक्त केली आहे.  दरम्यान,  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभेसाठी विशाखापट्टणम येथे आले असताना सत्यनारायण यांनी हा तिरंगा नरेंद्र मोदींच्या स्वाधीन केला. मात्र या तिरंग्याची वैशिष्ट्ये सांगण्याची संधी त्यांना मिळाली नाही. दरम्यान, हा तिरंगा तयार करण्याची प्रेरणा मला लिटिल इंडियन नावाच्या शॉर्ट फिल्ममधून मिळाली. या शॉर्ट फिल्ममध्ये नायक तिरंग्यातील तीन रंगाना एकत्र करून तिरंगा तयार करतो.'' असे सत्यनारायण यांनी सांगितले.  

टॅग्स :IndiaभारतAndhra Pradeshआंध्र प्रदेश