शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

प्रणवदांनी आरएसएसला सत्य काय ते दाखवून दिलं; आधीच्या टीकेनंतर काँग्रेसचा यू-टर्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 22:48 IST

प्रणव मुखर्जींच्या भाषणानंतर काँग्रेस नेत्यांचा सूर बदलला

नवी दिल्ली: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारल्यावर त्यांच्यावर काँग्रेसमधून जोरदार टीका झाली होती. मात्र मुखर्जींनी संघाच्या व्यासपीठावरुन काँग्रेसचे विचार मांडल्यानं आता काँग्रेस नेत्यांनी यू-टर्न घेतला आहे. प्रणवदांनी त्यांच्या भाषणातून संघाला त्यांच्याच व्यासपीठावरुन आरसा दाखवला, असं काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय प्रशिक्षण वर्गाच्या समारोप कार्यक्रमात प्रणव मुखर्जी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुखर्जींनी या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारणं काँग्रेसला फारसं रुचलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्यावर टीकादेखील झाली होती. मात्र मुखर्जींच्या भाषणानंतर काँग्रेसनं यू-टर्न घेत त्यांचं कौतुक सुरू केलं आहे. 'प्रणवदांनी संघाच्या व्यासपीठावरुन सहिष्णूता, धर्मनिरपेक्षता, सर्वसमावेशकता याबद्दलचे विचार मांडले. हेच विचार या देशाचा आत्मा आहेत. सार्वजनिक जीवनात हिंसा नको, मग ती कृतीतून प्रकट होणारी असो वा शब्दातून व्यक्त होणारी असो, ती टाळायला हवी. अहिंसा हाच या देशाच्या विचारांचा गाभा आहे, हा संदेश प्रणवदांनी त्यांच्या भाषणातून दिला,' असे कौतुकोद्गार सुरजेवाला यांनी काढले. संविधानावर असलेली श्रद्धा हाच खरा राष्ट्रवाद आहे, याची आठवण प्रणव मुखर्जी यांनी संघाला करुन दिल्याबद्दल काँग्रेसनं त्यांचं कौतुक केलं. 'लोकशाहीत संवादाला सर्वाधिक महत्त्व आहे. मोकळ्या मनानं सर्वांची बाजू ऐकून घ्यायला हवी. दुसऱ्याचा मताचा आदर करायला हवा, असे विचार प्रणवदांनी संघाच्या कार्यक्रमात मांडले. संघ आणि भाजपा यातून योग्य तो बोध घेतील, अशी आशा आहे. प्रणवदांच्या मार्गदर्शनामुळे भाजपा आणि संघाच्या वर्तणुकीत बदल होईल, अशी अपेक्षा बाळगूया,' असंही सुरजेवाला यांनी म्हटलं. त्याआधी प्रणव मुखर्जींनी संघाचं निमंत्रण स्वीकारल्यानं काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर मोठी टीका केली होती.  

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूरMohan Bhagwatमोहन भागवतcongressकाँग्रेस