धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 13:04 IST2024-10-06T13:00:50+5:302024-10-06T13:04:26+5:30
रामलीलाच्या मंचकादरम्यान श्री रामची भूमिका साकारणाऱ्या सुशील कौशिक यांना हृदयविकाराचा झटका आला यात त्यांचे निधन झाले.

धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला
दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाहदरा परिसरात श्रीरामची भूमिका करणाऱ्या व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सुशील कौशिक नावाचा कलाकार रंगमंचावर श्री रामची भूमिका साकारत असताना अचानक प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो मंचावरून खाली जाऊ लागले. हे पाहून लोक चिंताग्रस्त झाले आणि त्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. त्यांची प्रकृती बिघडल्याने सुशील कौशिक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. मृत सुशील कौशिक याचे वय ५४ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
सुशील कौशिक हे एक प्रॉपर्टी डीलर होते. ते दीर्घकाळ रामलीलाच्या मंचकाशी संबंधित होते. जेव्हा सुशील यांना तब्येत बिघडत असल्याचे जाणवले तेव्हा ते स्टेजवरून खाली आले, त्यामुळे लोकही घाबरले. यानंतर रुग्णवाहिका आणण्यात आली, मात्र रुग्णालयात पोहोचताच त्यांना मृत घोषित करण्यात आले.
सुशील कौशिक अनेक वर्षांपासून रामलीलाशी संबंधित होते. या व्हिडीओत भजनाचा आवाज येत असून रामची भूमिका साकारणारे सुशीलही खाली बसून गुणगुणत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर ते उठतात आणि थोडे चालतात आणि अचानक त्यांना छातीत दुखू लागते, त्यानंतर ते स्टेजच्या मागे जातात. सुशील कौशिक हे विश्वकर्मा नगर परिसरात राहत होते.
One more sudden cardiac death in Delhi.
— Hemant Rajaura (@hemantrajora_) October 6, 2024
Sushil Kaushik died of cardiac arrest during a performance in Delhi.
He played the role of Ram in Shri Ramlila Committee Jhilmil, Delhi pic.twitter.com/m1dE40RIGV