शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
3
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
4
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
5
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
6
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
7
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
8
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
9
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
10
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
11
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
12
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
13
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
14
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
15
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
16
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
17
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
18
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
19
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
20
Washim: ४५ वर्षीय महिलेला दगडाने ठेचून मारलं; आरोपीला पकडलं आणि घटना ऐकून पोलीस हादरले
Daily Top 2Weekly Top 5

त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 08:25 IST

काही दिवसांपूर्वी एका युवकाला काही अज्ञात व्यक्तींनी रस्त्यात अडवून, त्याचा प्रायव्हेट पार्ट कापल्याच्या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडवून दिली होती.

मध्यप्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एका युवकाला काही अज्ञात व्यक्तींनी रस्त्यात अडवून, त्याचा प्रायव्हेट पार्ट कापल्याच्या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडवून दिली होती. या संतापजनक घटनेमुळे गावकऱ्यांनी तीव्र निदर्शनं देखील केली होती आणि आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली होती. मात्र, आता या थरारक घटनेमागचं गूढ उकललं असून, पोलिसांच्या तपासात जे सत्य समोर आलं आहे, त्यानं सगळ्यांनाच धक्का दिला आहे. हा हल्ला दुसऱ्या कुणी केला नसून, खुद्द त्या युवकानेच स्वतःवर वार केल्याचं निष्पन्न झालं आहे!

गुन्हा लपवण्यासाठी रचला बनाव

गाडरवारा येथील डोंगरगाव पोलीस स्टेशन परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. पीडित युवकाने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं होतं की, तो बाईकवरून जात असताना मास्क घातलेल्या ४ ते ५ लोकांनी त्याला रस्त्यात अडवलं, जबरदस्तीने झुडपांमध्ये ओढून नेलं आणि त्याचं गुप्तांग कापलं. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या या युवकाच्या जबाबावर विश्वास ठेवून पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. संपूर्ण परिसरात नाकेबंदी करण्यात आली, संशयितांचा शोध घेण्यात आला आणि ही घटना अत्यंत गंभीरतेने घेतली गेली.

मानसिक तणावात उचलले धक्कादायक पाऊल!पोलिसांनी घटनेचा कसून तपास सुरू केल्यानंतर युवकाच्या जबाबात अनेक विसंगती आढळल्या. पोलिसांनी जेव्हा बारीकसारीक पुराव्यांची तपासणी केली, तेव्हा सत्य बाहेर आलं. या युवकाने ब्लेडने स्वतःच्या खासगी भागावर आणि मांडीवर वार केले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण गेल्या काही दिवसांपासून शारीरिक आणि तीव्र मानसिक तणावाखाली होता. याच मानसिक दबावातून त्यानं इतकं भयानक पाऊल उचललं आणि नंतर कुटुंब तसेच पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी पूर्णपणे खोटी कहाणी रचली होती.

युवकाची प्रकृती स्थिर

दरम्यान, या घटनेत गंभीर जखमी झालेल्या युवकाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती आहे. पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की, या प्रकरणात बाहेरच्या कोणत्याही हल्ल्याचा किंवा षडयंत्राचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. या अविश्वसनीय आणि धक्कादायक खुलाशानंतर पोलिसांनी आपला तपास थांबवला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Man fakes attack, cuts himself, deceives police in Narsinghpur.

Web Summary : In Narsinghpur, a man claimed attackers severed his private parts, sparking outrage. Police investigation revealed he self-inflicted the injuries due to mental stress, fabricating the story to mislead authorities. He is now receiving treatment; the case is closed.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश