शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला बिकिनीमध्ये पाहण्यासाठी त्याने ४१८ कोटींना खरेदी केलं संपूर्ण बेट, कोण आहे तो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 13:13 IST

Husband Gift Private Island For Wife:माझ्या अब्जाधीश पतीने मला बीचवर बिकिनीमघ्ये पाहण्यासाठी एक संपूर्ण बेट खरेदी केल्याचा दावा दुबईतील एका गृहिणीने केला आहे. २६ वर्षांच्या सौदी अल हिने इन्स्टाग्रामवर या खासगी बेटाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

माझ्या अब्जाधीश पतीने मला बीचवर बिकिनीमघ्ये पाहण्यासाठी एक संपूर्ण बेट खरेदी केल्याचा दावा दुबईतील एका गृहिणीने केला आहे. २६ वर्षांच्या सौदी अल हिने इन्स्टाग्रामवर या खासगी बेटाचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच त्याखाली लिहिलंय की, ‘’POV: तुला बिकिनी घालायची होती, म्हणून तुझ्या कोट्यधीश पतीने तुझ्यासाठी एक बेट खरेदी केलंय’’.  

२६ वर्षांची सौदी अल नदाक ही दुबईतील व्यावसायिक जमाल अल नदाक याची  पत्नी आहे. ती मुळची ब्रिटिश आहे. ती स्वत:ची ओळख पूर्णवेळ गृहिणी अशी करून देते. या उच्चभ्रू जोडप्याची ओळख दुबईत शिक्षण घेताना झाली होती. तसेच तीन वर्षांपूर्वी त्यांनी विवाह केला होता. अतिश्रीमंत गृहिणी असण्याबरोबरच सौदी ही एक इंफ्लुएंसर म्हणूनही ओळखली जाते. तिच्या इन्स्टा आणि टिकटॉक अकाउंटवरून तिची हायप्रोफाइल लाईफस्टाइल दिसत असते.  

सौदी अल नदाक हिने तिला पतीने भेट म्हणून दिलेल्या बेटाचा बनवलेला व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ आतापर्यंत २४ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. सौदी हिने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की,माझा पती गुंतवणुकीसाठी एक बेट खरेदी करण्याचा विचार करत होता. तसेच बीचवर मला सुरक्षित वाटावं, अशी त्याची अपेक्षा होती. त्यामुळे त्याने हे बेट खरेदी केलं.  

दरम्यान, सुरक्षा आणि खाजगीपणा जपण्यासाठी सौदी हिने या बेटाचं खरं ठिकाण गुप्त ठेवलं आहे. मात्र तिचा पती जमाल याने हे बेट सुमारे ५० दशलक्ष डॉलर (४१८ कोटी रुपये) एवढ्या किमतीला खरेदी केल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :FamilyपरिवारSocial Viralसोशल व्हायरलUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीJara hatkeजरा हटके