अभिनेता कामरांच्या याचिकेवर सुनावणीस हायकोर्टाचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 05:58 IST2020-03-21T05:58:02+5:302020-03-21T05:58:21+5:30

इंडिगो, विस्तारा आणि अन्य विमान कंपन्यांनी घातलेल्या विमान प्रवास बंदीला आव्हान देणारी विनोदी अभिनेता कुणाल कामरा यांची याचिका सुनावणी घेण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

HC refuses to hear actor Kamgar's plea | अभिनेता कामरांच्या याचिकेवर सुनावणीस हायकोर्टाचा नकार

अभिनेता कामरांच्या याचिकेवर सुनावणीस हायकोर्टाचा नकार

नवी दिल्ली : विमानात पत्रकार अर्णब गोस्वामी यांना हैराण केल्याबद्दल इंडिगो, विस्तारा आणि अन्य विमान कंपन्यांनी घातलेल्या विमान प्रवास बंदीला आव्हान देणारी विनोदी अभिनेता कुणाल कामरा यांची याचिका सुनावणी घेण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
कामरा यांचे गैरवर्तन अमान्य असून, विमानात असे वर्तन करण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे न्या. नवीन चावला यांनी म्हटले आहे. कोणत्याही विमान सेवा कंपनीला अंतरिम निर्देश देण्याबाबत कामर यांची तोंडी विनंतीही कोर्टाने अमान्य केली. विमान प्रवासासाठी इच्छुक असल्यास त्यांनी योग्य मार्गाने कोर्टाकडे यायला हवे होते, प्रसिद्धी मिळविण्यासाठीच हा खटाटोप करण्यात आल्याचे दिसते.

Web Title: HC refuses to hear actor Kamgar's plea