शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

दहशतीचे वातावरण - केजरीवाल

By admin | Updated: November 16, 2016 01:16 IST

मोदी सरकार हे श्रीमंताचे मित्र आणि गरीबांचे शत्रू असलेले सरकार आहे. नोटबंदीच्या निर्णयानंतर देशभर दहशतीचे वातावरण आहे.

सुरेश भटेवरा / नवी दिल्लीमोदी सरकार हे श्रीमंताचे मित्र आणि गरीबांचे शत्रू असलेले सरकार आहे. नोटबंदीच्या निर्णयानंतर देशभर दहशतीचे वातावरण आहे. अनेक विवाह स्थगित झाले आहेत, तर काही मोडले आहेत. मुलीच्या विवाह सोहळ्यात कोट्यवधींचा खर्च करणाऱ्या जनार्दन रेड्डीच्या घरी मोदी सरकार सीबीआयला पाठवीत नाही. अडीच लाखांची रक्कम बँकेत जमा करणाऱ्या सामान्य माणसाच्या मात्र हात धुवून मागे लागले आहे, अशी जोरदार टीका करीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी दिल्लीची विधानसभा बुधवारी दणाणून सोडली. नोटबंदीचा वादग्रस्त निर्णय राष्ट्रपतींनी थांबवावा, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. केजरीवाल म्हणाले, एकीकडे धनाढ्य उद्योग घराण्यांचे १ लाख १४ हजार कोटींचे कर्ज वर्षभरात निर्लज्जपणे माफ करण्याचे औदार्य मोदी सरकारने दाखवले. जन धन खात्यात थोडीफार रोख रक्कम जमा करणाऱ्या गरीबांना धमकावण्याचा खेळ सुरू झाला आहे. पनामा पेपर्स लीकमधे मोदींच्या मित्रांची नावे आहेत, ही बाब आता लपून राहिलेली नाही. काळ्या पैशांच्या व्यवहारात पंतप्रधानांचा थेट नामोल्लेख झाला आहे, असे केजरीवाल म्हणाले. आदित्य बिर्ला ग्रुपच्या कार्यालयात सीबीआयने धाड घातल्यानंतर २५ कोटींची बेहिशेबी रोकड सापडली तेव्हा अनेक गौप्यस्फोट झाले होते, असे सांगून केजरीवालांनी त्यात पंतप्रधानांचे नाव घेतले.