शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

राहुल गांधींचे एब्स पाहिले का? ऑलिंपिक विजेत्या खेळाडूनंही केलंय कौतुक

By महेश गलांडे | Published: February 26, 2021 6:42 PM

केरळच्या कोल्लम येथील समुद्र किनाऱ्यावर मासे पकडण्यासाठी मच्छिमार समुद्रात जाळं टाकण्यासाठी उतरले, त्यावेळी राहुल गांधीही पाण्यात उतरले. त्यांनीही मच्छिमारांसोबत मासे पकडले.

ठळक मुद्देबॉक्सरचे abs असे कॅप्शनही विजेंदरने दिलंय. तसेच, अतिशय धाडसी, तरुण तंदुरुस्त लोकनेता राहुल गांधीजी, असेही विजेंदर सिंग याने आपल्या फोटोसह लिहिलंय.

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी नेहमीच आपल्या सर्वसाधारण वागण्यामुळे चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी केरळमधील मच्छिमारांसमेवत एक उनाड दिवस व्यतीत केला. मच्छिमारांचे जीवन जवळून पाहण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी त्यांनी चक्क समुद्रात त्यांच्यासोबत उडी मारली. मासेमारीसह समुद्रात पोहण्याचा आनंदही घेतला. त्यानंतर, राहुल गांधींचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत, त्यातीलच एक फोटो बीसीसीआयचे माजी अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी शेअर केला आहे. 

केरळच्या कोल्लम येथील समुद्र किनाऱ्यावर मासे पकडण्यासाठी मच्छिमार समुद्रात जाळं टाकण्यासाठी उतरले, त्यावेळी राहुल गांधीही पाण्यात उतरले. त्यांनीही मच्छिमारांसोबत मासे पकडले. किनाऱ्यावर येण्याआधी राहुल गांधी हे किमान १० मिनिटं मच्छिमारांसोबत समुद्रात पोहत होते. राहुल गांधींच्या समुद्रातील डुबकीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. काँग्रेस नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी असा हा आमचा सर्वसाधारण नेता म्हणून राहुल गांधींचे फोटो शेअर केले. यापूर्वीही राहुल गांधींचा बिर्याणी बनवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता.  राहुल गांधीच्या या फोटोनंतर आता त्यांचा आणखी एक फोटो चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर हाही फोटो व्हायरल होत असून या फोटोमध्ये राहुल गांधींचे एब्स Abs दिसत आहेत. राहुल गांधींचा हा फोटो ऑलिंपिक कास्यपदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंग याने ट्विटरर अकाऊंटवरुन शेअर केलाय. बॉक्सरचे abs असे कॅप्शनही विजेंदरने दिलंय. तसेच, अतिशय धाडसी, तरुण तंदुरुस्त लोकनेता राहुल गांधीजी, असेही विजेंदर सिंग याने आपल्या फोटोसह लिहिलंय. तर, राजीव शुक्ला यांनीही हा फोटो ट्विट करत, समुद्रात पोहण्याचा आनंद घेऊन बाहेर आल्यानंतर राहुल गांधींचा हा फोटो, पाहा abs असे शुक्ला यांनी म्हटलंय.   

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीVijender Singhविजेंदर सिंगKeralaकेरळViral Photosव्हायरल फोटोज्Twitterट्विटर