Have you seen Rahul Gandhi's abs? Olympic champion vijender singh athletes are also appreciated | राहुल गांधींचे एब्स पाहिले का? ऑलिंपिक विजेत्या खेळाडूनंही केलंय कौतुक

राहुल गांधींचे एब्स पाहिले का? ऑलिंपिक विजेत्या खेळाडूनंही केलंय कौतुक

ठळक मुद्देबॉक्सरचे abs असे कॅप्शनही विजेंदरने दिलंय. तसेच, अतिशय धाडसी, तरुण तंदुरुस्त लोकनेता राहुल गांधीजी, असेही विजेंदर सिंग याने आपल्या फोटोसह लिहिलंय.

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी नेहमीच आपल्या सर्वसाधारण वागण्यामुळे चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी केरळमधील मच्छिमारांसमेवत एक उनाड दिवस व्यतीत केला. मच्छिमारांचे जीवन जवळून पाहण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी त्यांनी चक्क समुद्रात त्यांच्यासोबत उडी मारली. मासेमारीसह समुद्रात पोहण्याचा आनंदही घेतला. त्यानंतर, राहुल गांधींचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत, त्यातीलच एक फोटो बीसीसीआयचे माजी अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी शेअर केला आहे. 

केरळच्या कोल्लम येथील समुद्र किनाऱ्यावर मासे पकडण्यासाठी मच्छिमार समुद्रात जाळं टाकण्यासाठी उतरले, त्यावेळी राहुल गांधीही पाण्यात उतरले. त्यांनीही मच्छिमारांसोबत मासे पकडले. किनाऱ्यावर येण्याआधी राहुल गांधी हे किमान १० मिनिटं मच्छिमारांसोबत समुद्रात पोहत होते. राहुल गांधींच्या समुद्रातील डुबकीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. काँग्रेस नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी असा हा आमचा सर्वसाधारण नेता म्हणून राहुल गांधींचे फोटो शेअर केले. यापूर्वीही राहुल गांधींचा बिर्याणी बनवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. 


राहुल गांधीच्या या फोटोनंतर आता त्यांचा आणखी एक फोटो चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर हाही फोटो व्हायरल होत असून या फोटोमध्ये राहुल गांधींचे एब्स Abs दिसत आहेत. राहुल गांधींचा हा फोटो ऑलिंपिक कास्यपदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंग याने ट्विटरर अकाऊंटवरुन शेअर केलाय. बॉक्सरचे abs असे कॅप्शनही विजेंदरने दिलंय. तसेच, अतिशय धाडसी, तरुण तंदुरुस्त लोकनेता राहुल गांधीजी, असेही विजेंदर सिंग याने आपल्या फोटोसह लिहिलंय. तर, राजीव शुक्ला यांनीही हा फोटो ट्विट करत, समुद्रात पोहण्याचा आनंद घेऊन बाहेर आल्यानंतर राहुल गांधींचा हा फोटो, पाहा abs असे शुक्ला यांनी म्हटलंय. 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Have you seen Rahul Gandhi's abs? Olympic champion vijender singh athletes are also appreciated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.