ेेएकमेकांविषयी किमान आदराने वागा : दलाई लामा

By admin | Published: August 31, 2015 12:24 AM2015-08-31T00:24:32+5:302015-08-31T00:24:32+5:30

त्र्यंबकेश्वर : एकमेकांविषयी आदर ठेवा, सर्व धर्म हीच शिकवण देतात असा संदेश बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी रविवारी त्र्यंबकेश्वर येथे दिला. रमणरेती येथील काव्यगुरू शरणानंद यांचा त्र्यंबकेश्वर येथे आश्रम असून ते उदासिन बडा आखाड्याचे महामंडलेश्वर आचार्य आहे. त्यांच्या नियंत्रणावरून दलाई लामा येथे आले आहेत. रविवारी त्यांची त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याविषयी चर्चा झाली. यावेळी कविगुरू शरणानंद, स्वामी परमानंद, स्वागी ज्ञानानंद आदि उपस्थित होते.

Have least respect for each other: Dalai Lama | ेेएकमेकांविषयी किमान आदराने वागा : दलाई लामा

ेेएकमेकांविषयी किमान आदराने वागा : दलाई लामा

Next
>
पणजी : लुईस बर्जर कंपनीचे उपाध्यक्ष आणि लाच प्रकरणात महत्त्वाची भूमिका असलेले जेम्स मॅकलंग यांचा अमेरिकेत जबाब घेण्यासाठी आणि कंपनीची कागदपत्रे मिळविण्यासाठी विनंती पत्र पाठविण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
गुन्हे अन्वेषण विभागाकडून विनंती पत्रासाठी तयारी सुरू झाली आहे. इंटरपोलच्या मदतीने ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. लुईस बर्जर कंपनीची जैका प्रकल्पाच्या संबंधातील कराराची कागदपत्रे सीआयडीला हवी आहेत. त्यासाठी कंपनीच्या गुडगाव आणि हैदराबाद येथील कार्यालयाला समन्स बजावले होते. तसेच अमेरिकेतील न्यू जर्सी येथील न्यायालयातून कागदपत्रे मागविण्यासाठी विनंती पत्रास मंजुरीचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविला होता. त्यास २० दिवसांनी मंजुरी मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
------------

Web Title: Have least respect for each other: Dalai Lama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.