शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

हाथरस येथील चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा वाढला, रुग्णालयात मृतदेह ठेवण्यासाठीही उरली नाही जागा   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 18:59 IST

Hathras stampede: उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका सत्संगामध्ये चेंगराचेंगरी होऊन भीषण दुर्घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये आतापर्यंत ८६ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मृतांचा आकडा १०० हून अधिक झाल्याचा दावा काही माध्यमांकडून करण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका सत्संगामध्ये चेंगराचेंगरी होऊन भीषण दुर्घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये आतापर्यंत ८६ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मृतांचा आकडा १०० हून अधिक झाल्याचा दावा काही माध्यमांकडून करण्यात येत आहे. चेंगराचेंगरीची भीषणता विचारात घेता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस आणि प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. तसेच घटनास्थळावर प्रशासकीय अधिकारी दाखल झाले आहेत. 

हाथरस येथील फुलरई मुगलगढी येथे या सत्संगाचं आयोजन करण्यात आलं होतं. सरकार नारायण विश्व हरी भोले बाबा यांचा हा सत्संह होता. बाबांचं प्रवचन संपल्यानंतर चरणस्पर्श करून आशीर्वाद घेण्यासाठी झुंबड उडाली आणि त्यातून ही चेंगराचेंगरी झाली, असे सांगण्यात येत आहे. 

दरम्यान, हाथरस येथे झालेल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केले असून, घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदत कार्याला वेग आणण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसेच जखमींवर योग्य उपचार करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधाक एफआयआर दाखल करून कारवाई करण्याची तयारी शासनाकडून करण्यात येत आहे.  

तसेच या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. एडीजी आग्रा विभाग यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली समिती या दुर्घटनेची चौकशी करणार आहे. तसेच अलिगडच्या कमिश्नरांनाही या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारत