निपाणीतील ६० वर्षांच्या बसस्थानकावर हातोडा!
By Admin | Updated: May 12, 2014 20:56 IST2014-05-12T20:56:40+5:302014-05-12T20:56:40+5:30
निपाणी : कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांचे प्रवेशद्वार असलेल्या निपाणीतील बसस्थानकाच्या निर्मितीसाठी राज्य सरकारने पाच कोटी ५१ लाखांचा निधी मंजूर केला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ६० वर्षांपूर्वीच्या जुन्या बसस्थानकावर हातोडा टाकून कामाला प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे तिन्ही राज्यांतील लोकांना या सुसज्ज बसस्थानकाचा लाभ होणार आहे. बेळगाव जिल्ात बेळगावनंतर निपाणी हे शहर मोठे आहे. येथील बसस्थानकातून कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या बस धावत असल्याने नेहमीच हे बसस्थानक गजबजलेले असते; पण गेल्या काही वर्षांपासून स्थानकात समस्या वाढल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. महाराष्ट्रातील अनेक गावांत जाणार्या प्रवाशांना निवाराशेडच कमी पडत असल्याने प्रवाशांना उन्हात व पावसातच थांबावे लागत होते. त्याची दखल घेऊन मंत्री प्रकाश ह

निपाणीतील ६० वर्षांच्या बसस्थानकावर हातोडा!
न पाणी : कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांचे प्रवेशद्वार असलेल्या निपाणीतील बसस्थानकाच्या निर्मितीसाठी राज्य सरकारने पाच कोटी ५१ लाखांचा निधी मंजूर केला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ६० वर्षांपूर्वीच्या जुन्या बसस्थानकावर हातोडा टाकून कामाला प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे तिन्ही राज्यांतील लोकांना या सुसज्ज बसस्थानकाचा लाभ होणार आहे. बेळगाव जिल्ात बेळगावनंतर निपाणी हे शहर मोठे आहे. येथील बसस्थानकातून कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या बस धावत असल्याने नेहमीच हे बसस्थानक गजबजलेले असते; पण गेल्या काही वर्षांपासून स्थानकात समस्या वाढल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. महाराष्ट्रातील अनेक गावांत जाणार्या प्रवाशांना निवाराशेडच कमी पडत असल्याने प्रवाशांना उन्हात व पावसातच थांबावे लागत होते. त्याची दखल घेऊन मंत्री प्रकाश हुक्केरी आणि आमदार शशिकला ज्वोल्ले यांनी पाठपुरावा केल्याने सुसज्ज बसस्थानक निर्मितीसाठी मोठा निधी मंजूर झाला आहे. जुन्या बसस्थानकातील व्यावसायिकांना दोन महिन्यांपूर्वीच अन्यत्र हलविण्यात आले आहे. इमारत पाडताना प्रवासी, वाहनांना व्यत्यय होऊ नये यासाठी इमारतीच्या परिसरात लाकडी बांबूचे कुंपण घालण्यात आले आहे. या बसस्थानकाचे काम सुरू असताना स्थानकाचे स्थलांतर न करता शेजारच्या रिकाम्या जागेतच तात्पुरती प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे; पण फलकच नसल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडत आहे. स्थानकातील नियंत्रण कक्ष जवळच्याच गणेश मंदिराशेजारी हलविण्यात आला आहे. सध्या कडक ऊन आणि वळवाच्या जोराच्या सरी येत असल्याने प्रवाशांची मात्र त्रेधातिरपीट उडत आहे. बसस्थानकाची जुनी प्रशस्त इमारत पाडण्यासाठी कंत्राटदाराला ७५ हजार रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. इमारत पाडल्यानंतर दगड, माती, स्टील आणि लोखंडी साहित्य कंत्राटदाराच्या मालकीचे होणार आहे. सध्या पावसाळा तोंडावर आला असून, इमारत निर्मितीचे काम वेळेत पूर्ण केल्यास त्याचा प्रवाशांना लाभ होणार आहे, अन्यथा समस्यांमध्ये आणखी भर पडणार आहे. (प्रतिनिधी) फोटो - 09एनपीएन01 - बसस्थानक इमारतीचे पाडण्यात येत असलेले बांधकाम.