‘इस्लाम स्वीकारल्यानेच हे घडले’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 02:02 IST2018-03-11T02:02:05+5:302018-03-11T02:02:05+5:30

मी इस्लाम स्वीकारल्याने हे सर्व घडले, अशी प्रतिक्रिया हादियाने दिली आहे. केरळ उच्च न्यायालयाने रद्द केलेले साफीन जहानसोबतचे तिचे लग्न सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरविले आहे. त्यानंतर तिने हे वक्तव्य केले.

 'This has happened because of accepting Islam' | ‘इस्लाम स्वीकारल्यानेच हे घडले’

‘इस्लाम स्वीकारल्यानेच हे घडले’

कोळिकोड - मी इस्लाम स्वीकारल्याने हे सर्व घडले, अशी प्रतिक्रिया हादियाने दिली आहे. केरळ उच्च न्यायालयाने रद्द केलेले साफीन जहानसोबतचे तिचे लग्न सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरविले आहे. त्यानंतर तिने हे वक्तव्य केले.
हादियाने सांगितले की, कोणत्याही धर्म स्वीकारण्याचे करण्याचे स्वातंत्र्य घटनेने दिले आहे. तरीही मी इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर हे सर्व घडून आले. हादिया आणि तिचा पती शनिवारी तामिळनाडूच्या सेलमहून केरळच्या कोळिकोडला आले. पॉप्युलर फ्रंट आॅफ इंडियाच्या (पीएफआय) कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. हादियाने सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने आमचे लग्न वैध ठरविल्यामुळे आम्हाला आमचे स्वातंत्र्य मिळाल्यासारखे वाटत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ८ मार्च रोजी दिलेल्या निर्णयात केरळ उच्च न्यायालयाचा आदेश रद्द ठरवून हादियाचे लग्न कायदेशीर असल्याचा निर्वाळा दिला होता. हादिया ही आधी अखिला अशोकन होती. (वृत्तसंस्था)

Web Title:  'This has happened because of accepting Islam'

टॅग्स :Keralaकेरळ