शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 22:10 IST

लवकरच महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुका होणार आहेत.

Chandrababu Naidu : जम्मू-काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी(9 ऑक्टोबर 2024) जाहीर झाले. भाजपने हरयाणामध्ये पूर्ण बहुमत मिळवले आहे, तर जम्मू-काश्मीरमध्येही विक्रमी 29 जागा जिंकल्या. तर, या दोन्ही राज्यात काँग्रेसने अतिशय खराब कामगिरी केली. दरम्यान, भाजपच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल एनडीएच्या मित्रपक्षांकडूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी तर आगामी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांबाबत मोठे भाकीत केले आहे.

महाराष्ट्र आणि झारखंडमध्येही निकालाची पुनरावृत्ती होईल आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू म्हणाले की, या विजयाबद्दल भाजपचे अभिनंदन. जम्मू-काश्मीरमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. मला खात्री आहे की, आगामी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांचे निकाल हरियाणाप्रमाणेच असतील. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले 'एक राष्ट्र एक निवडणूक'ला पाठिंबा देण्याची गरज असल्याचे म्हटले. वारंवार निवडणुकांमुळे विकास कार्यात अडथळा येतो, असा तक्र त्यांनी यावेळी मांडला.

नितीशकुमार यांनीही अभिनंदन केलेहरियाणात भारतीय जनता पक्षाच्या विजयाबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही अभिनंदन केले. नितीश कुमार म्हणाले- भारतीय जनता पार्टीने हरियाणा विधानसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा. हरियाणाच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्षम नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. जेडीयूचे खासदार आणि केंद्रीय मंत्री लालन सिंह यांनीही म्हटले की, हरियाणा निवडणुकीच्या निकालाने हे सिद्ध केले की, पंतप्रधान मोदी अजूनही देशात लोकप्रिय आहेत आणि त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवनस वाढत आहे.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Jharkhandझारखंड