शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

हरियाणातील BJP सरकार कोसळणार? काँग्रेसने केला बहुमताचा दावा, राज्यपालांना लिहिले पत्र...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 18:01 IST

Haryana Political Crisis: तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे हरियाणातील भाजप सरकार अल्पमतात आले आहे.

Haryana Political Crisis: लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपला जोरदार धक्का बसला आहे. तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे हरियाणातील भाजप सरकार अल्पमतात आले आहे. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपिंदर सिंग हुड्डा यांनी बहुमताचा दावा केला आहे. काँग्रेसकडे 30, जेजेपीकडे 10 आणि अपक्ष 3 आमदार एकत्र असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

काँग्रेस नेते भूपिंदर सिंग हुड्डा यांनी नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्याकडे राजीनामा मागितला आहे. यासोबतच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करुन नव्याने विधानसभा निवडणुका घेण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे. हुड्डा यांचे सचिव शादी लाल कपूर यांनी हरियाणा राजभवनाला पत्र लिहून राज्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी राज्यपालांकडे वेळ मागितला आहे. 

जेजेपीचे राज्यपालांना पत्र हरियाणातील 3 अपक्ष आमदारांनी नायबसिंग सैनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याची घोषणा केल्यानंतर जननायक जनता पक्षही सक्रिय होताना दिसत आहे. जेजेपीने राज्यपाल बंडारू दात्रेय यांना पत्र लिहून राज्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर योग्य निर्णय घेण्याची विनंती केली आहे. जेजेपी नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात नायब सिंग सैनी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला आहे.

भाजप सरकार संकटात7 मे रोजी राज्यातील तीन अपक्ष आमदारांनी भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याची घोषणा केल्यामुळे नायब सिंग सैनी यांचे सरकार अल्पमतात आले आहे. सध्या नायब सरकारकडे केवळ 43 आमदारांचे संख्याबळ आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि रणजीत चौटाला यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभेतील एकूण आमदारांची संख्या 88 झाली आहे. या आकडेवारीनुसार राज्यात बहुमतासाठी 45 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे.

टॅग्स :Haryanaहरयाणाharyana election 2019हरियाणा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४