शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

इतरांनी मृत समजले, पण तिने वाचवले; अपघातग्रस्त तरुणासाठी देवदूत बनून आली नर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 17:26 IST

नर्सच्या प्रयत्नाने तरुणाचा श्वास पुन्हा सुरू झाला.

हरियाणातील करनालमध्ये रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेल्या तरुणासाठी एक महिला नर्सिंग सुपरवायझर देवदूत बनून आली. ज्या अपघातग्रस्त तरुणाला इतरांनी मृत समजून सोडून दिले होते, त्यालाच सीपीआर देऊन महिला नर्सने वाचवले. एवढेच नाही तर पोलिसांच्या मदतीने तिने तरुणाला रुग्णालयात नेले आणि आवश्यक उपचारही केले. तरुणाची प्रकृती थोडी सामान्य झाल्यानंतर त्याला कर्नालमधील कल्पना चावला रुग्णालयात रेफर करण्यात आले. या महिलेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून, तिच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

महिला नर्स ठरली देवदूतडॉक्टरांच्या मते तरुणाला वेळेवर सीपीआर दिला नसता तर त्या त्याचा जीव जाऊ शकला असता. याबाबत महिला नर्स अंकिता मान म्हणाली की, ती गेल्या दीड वर्षांपासून रुग्णालयात काम करते. मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास ती तिच्या मुलासाठी आईस्क्रीम आणण्यासाठी बाहेर आली होती. यावेळी दिला सेक्टर 6 मधील गुरुद्वाराजवळ रस्त्याच्या कडेला गर्दी जमलेली दिसली. तिने जवळ जाऊन पाहिले तर रस्त्याच्या कडेला एक तरुण बेशुद्ध पडलेला दिसला.

सीपीआर देऊन वाचवले प्राणअंकिताने त्या तरुणाबद्दल विचारपूस केली असता इतरांनी तो मृत असल्याचे सांगितले. अंकिता वैद्यकीय क्षेत्रातील असल्याने तिने लगेच त्या तरुणाची नाडी तपासली अन् तिला तो तरुण जिवंत असल्याचे समजले. क्षणाचाही विलंबन न करता तिने त्या तरुणाला सीपीआर देण्यास सुरुवात केली. सीपीआर दिल्यानंतर त्या तरुणाची प्रकृती सुधारू लागली आणि तो पुन्हा श्वास घेऊ लागला. यानंतर अंकिताने ताबडतोब विर्क हॉस्पिटलची रुग्णवाहिका बोलावली आणि त्या तरुणाला रुग्णालयात नेले. तिथे प्राथमिक उपचार दिल्यानंतर त्याला कल्पना चावला मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले.

श्वासनलिकेमध्ये अन्न अडकलेअंकिताने सांगितले की, तो तरुण सुमारे 25 वर्षांचा होता. त्याचा अपघात झाला अन् अपघातानंतर त्याला उलट्या झाल्या. उलटी झालेले अन्न त्याच्या श्वासनलिकेमध्ये अडकल्यामुळे तो श्वास घेऊ शकला नव्हता. जेव्हा सीपीआर देण्यात आला तेव्हा त्याचा श्वास सुरू झाला. अंकिताचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या या कामाचे शहरातून कौतुक होत आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाHaryanaहरयाणा