शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
5
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
6
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
7
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
8
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
9
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
10
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
11
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
12
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
13
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
14
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
15
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
16
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
17
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
18
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
19
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
20
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

Election Results 2024: हरियाणात मोठा उलटफेर, निकालात भाजपचं वादळ! हॅटट्रिकसह गुलाल उधळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 11:13 IST

महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्र, झारखंड आणि दिल्लीमध्ये काही महिन्यांतच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या दृष्टीनेही हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल महत्वाचे आहेत.

हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. यानंतर एक्झिटपोल आले. या एक्झिटपोलमध्ये दोन्ही राज्यांत काँग्रेसला संधी तर भाजपची धूळ-धाण उडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. आज या दोन्ही राज्यांचे निकाल येत असून, विविध संस्थांनी हरिणाच्या बाबतीत दिलेला एक्झिट पोल पूर्णपणे फेल जाताना दिसत आहे. हरिणायात भाजपचे जोरदार वादळ बघायला मिळत आहे. भाजपने बहुमताचा आकडा गाठल्याचे दिसत आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये भाजप पिछाडीवर आहे. 

हरियाणामध्ये मतमोजणीच्या सुरुवातीला भाजप पिछाडीवर तर काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत होते. मात्र, आता मोठा उलफेर झाला असून भाजपने काँग्रेसला मागे टाकले आहे. तर जम्मू-काश्मीरमध्ये सकाळी सुरुवातीपासूनच अपेक्षेप्रमाणे काँग्रेस आघाडी आघाडीवर दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्र, झारखंड आणि दिल्लीमध्ये काही महिन्यांतच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या दृष्टीनेही हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल महत्वाचे आहेत.

हरियाणातील निवडणूक निकालात भाजपचे वादळ बघायला मिळत आहे. येथे विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. तर बहुमतासाठी कुठल्याही पक्षाला 46 जागांची आवश्यकता आहे. भाजपने बहुमताचा आकडा गाठला असून 49 जागांवर आघाडीवर आहे. येथे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत आहे. तर काँग्रेस 35 आणि अपक्ष 4 जागांवर आघाडीवर आहे. 

भाजप हॅटट्रिकसह गुलाल उधळणार - हरयाणामध्ये गेल्या 10 वर्षापासून भाजप सत्तेवर आहे. तर आतापर्यंतचे आकडे बघा भाजप हरियाणा विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅटट्रीक करताना दिसत आहे. अर्थात येथे भाजप विजयी झाल्यास हॅट्रिकसह गुलाल उधळेल.

अशी आहे जम्मू काश्मीरची स्थिती - तर जम्मू-काश्मीरमध्येही विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. येथील निकालात भाजप 28 जागांवर, जेकेएनसी 38 जागांवर, काँग्रेस 8 जागांवर तर इतर 8 जागांवर आघाडीवर आहेत. जम्मू-काश्मीरात शेवटची विधानसभा निवडणूक 2014 मध्ये झाली होती. तेव्हा भाजपने पीडीपीसोबत युती करून सरकार स्थापन केले होते. नंतर भाजप सरकारमधून बाहेर पडला होता. दरम्यान, केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवले. यानंतर तेथे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका पार पडल्या. यामुळे येथील  निवडणूक अनेक अर्थांनी विशेष होती. येथे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने एकत्रितपणे निवडणूक लढवली, तर भाजप स्वतंत्रपणे निवडणुकीच्या मैदानात होता.

टॅग्स :haryana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाElectionनिवडणूक 2024congressकाँग्रेसvidhan sabhaविधानसभा