शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची मुसंडी, भाजपा मागे; पण हरयाणात कल पूर्णच फिरला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 10:26 IST

Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 : हरयाणा आणि जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांचे आकडे समोर येण्यास सुरूवात झाली आहे.

Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 ( Marathi News ) : मागील काही दिवसापासून हरयाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. दोन दिवसापूर्वी आलेल्या एक्झिट पोलमध्ये दोन्ही राज्यात भाजपाची पिछेहाट होण्याचा अंदाज दिला होता, तर काँग्रेस मोठी मुसंडी मारणार असल्याचे दाखवले होते. दरम्यान, आता आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून आकड्यांचे कलही समोर आलेत. मतमोजणीच्या सुरुवातीला हरयाणामध्येकाँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसत होते. पण, आता आकड्यांमध्ये पुन्हा बदल झाला आहे. आता भाजपा आणि काँग्रेसमध्ये काट्याची लढत दिसत आहे. तर जम्मू-काश्मीरमध्ये सकाळी सुरुवातीपासूनच काँग्रेस आघाडीने आघाडी घेतल्याचे दिसत आहे. 

Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: हरयाणात गेम पलटला! भाजप ४५, काँग्रेस ४२; जम्मूमध्ये स्थिती जैसे थे

जम्मू -काश्मीरमध्ये भाजपा मागे पडल्याचे दिसतंय. हरयाणामध्येही सुरुवातीला भाजपा मागे पडली होती, पण आता यात मोठा बदल झाला आहे. भाजपाने मुसंडी मारण्यास सुरुवात केली आहे. भाजपाने दोन्ही राज्यात प्रचारादरम्यान डबल इंजिन सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. पण, समोर आलेले आकडे पाहता भाजपा अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. 

हरयाणात भाजपा १० वर्षापासून सत्तेत

हरयाणामध्ये मागील दहा वर्षापासून भाजपा सत्तेत आहे. यामुळे भाजपाला तिसऱ्यांदा सत्तास्थापन करण्याबाबत आत्मविश्वास आहे. तर जम्मू-काश्मीरमध्ये २०१४ मध्ये निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी भाजपाने पीडीपीसोबत युती करुन सरकार स्थापन केले होते. पण आता आलेल्या आकड्यांवरुन भाजपाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. 

गेल्या दोन महिन्यांपासून या दोन राज्यातील निवडणुकांची चर्चा सुरू आहे. हरयाणामध्ये ९० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले आहे, तर जम्मू-काश्मीरमध्ये ९० जागांसाठी तीन टप्प्यात मतदान झाल्या आहेत. या दोन्ही राज्यात काँग्रेसला पुन्हा एकदा यश मिळेल अशी अपेक्षा नेत्यांनी व्यक्त केली आहे. तर भाजपाच्या नेत्यांनीही हरयाणामध्ये विजयाचा अंदाज व्यक्त केलाय. 

जम्मू-काश्मीरमध्ये शेवटच्या निवडणुका २०१४ मध्ये झाल्या होत्या. यावेळची निवडणूक अनेक अर्थांनी खास आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने ही निवडणूक लढवत आहेत, तर भाजप स्वतंत्र निवडणूक लढवत आहे.

आतापर्यंत आलेले कल काय?

आज सकाळपासून या दोन्ही राज्यातील निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. सकाळी १०.१५ वाजेपर्यंत हरयाणामध्ये भाजपा ४८  जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस ३४ जागांवर आघाडीवर आहे.

जम्मू-काश्मीरमध्येही आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीलाच भाजपा पिछाडीवर असल्याचे दिसत आहे.  भाजपा २८ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस आघाडी- ४८ जागांवर आघाडीवर आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक 2024Haryanaहरयाणाjammu and kashmir assembly election 2024जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४haryana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस