मोठी बातमी! कोरोना लशीचा डोस घेतलेल्या मंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण

By मोरेश्वर येरम | Published: December 5, 2020 12:09 PM2020-12-05T12:09:45+5:302020-12-05T14:29:47+5:30

अंबालाच्या सिव्हील रुग्णालयात अनिल विज यांच्यावर उपचार सुरु आहेत. विज यांनी घेतला होता 'कोवॅक्सीन'चा डोस

haryana Health Minister Anil Vij Tested Corona Positive | मोठी बातमी! कोरोना लशीचा डोस घेतलेल्या मंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण

मोठी बातमी! कोरोना लशीचा डोस घेतलेल्या मंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण

Next
ठळक मुद्देअनिल विज यांनी घेतला होता 'कोवॅक्सीन'चा डोसकोरोना लशीचा डोस घेतल्यानंतरही अनिल विज यांना कोरोनाची लागणअनिल विज यांच्या अंबालाच्या सिव्हील रुग्णालयात उपचार

चंदीगढ
कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत स्वयंसेवक झालेले हरियाणाचे आरोग्य आणि गृहमंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण झाली आहे. विज यांनी ट्विटरच्या माध्यामातून याबाबतची माहिती दिली आहे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्यांनाही तातडीने कोविडची चाचणी करण्याचं आवाहन विजय यांनी केलं आहे. 

"मी कोरोना संक्रमित असल्याचं आढळून आलं आहे. अंबालाच्या सिव्हील रुग्णालयात माझ्यावर उपचार सुरू असून माझ्या संपर्कात आलेल्यांनी तातडीने कोविडची चाचणी करुन घ्यावी", असं ट्विट अनिल विज यांनी केलं आहे. 

विज यांनी घेतला होता 'कोवॅक्सीन'चा डोस
हरियाणामध्ये २० नोव्हेंबर रोजी 'कोवॅक्सीन' या कोरोवरील लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली होती. यात अनिल विज यांनी स्वत:हून पुढे येत चाचणीसाठी तयारी दर्शविली होती. २० नोव्हेंबर रोजी विज यांनी कोवॅक्सीनचा पहिला डोस घेतला होता. विज यांच्यासोबत २०० जणांना कोवॅक्सीनचा डोस देण्यात आला होता. 

दुसरा डोस २८ दिवसांनंतर देणार असल्याचं सांगितलं गेलं होतं. पण त्याआधीच अनिल विज हे कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं समोर आलं आहे. आयसीएमआरच्या संयुक्त विद्यमाने भारत बायोटेक कंपनीकडून कोरोनावर मात करणाऱ्या 'कोवॅक्सीन' या लशीची निर्मिती केली जात आहे.

'भारत बायोटेक'चं स्पष्टीकरण
अनिल विज यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यावर 'भारत बायोटेक'च्या 'कोवॅक्सीन' या कोरोनावरील लशी संदर्भात प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. त्यावर आता 'भारत बायोटेक'कडून अधिकृत स्पष्टीकरण जारी करण्यात आलं आहे. "कोवॅक्सीनची चाचणी ही दोन टप्प्यात केली जात आहे. या लशीचे दोन डोस घेणं गरजेचं आहे. पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जात आहे. लशीची परिणामकारता ही दोन डोस घेतल्याच्या १४ दिवसांनंतर दिसून येते", असं स्पष्टीकरण 'भारत बायोटक'कडून देण्यात आलं आहे.

Read in English

Web Title: haryana Health Minister Anil Vij Tested Corona Positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.