शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
3
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
4
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
5
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
6
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
7
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
8
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
9
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
10
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
11
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
13
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
14
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
15
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
16
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
17
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
18
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
19
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
20
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा

Video: पळाले, पडले, शर्टही फाटला...माजी काँग्रेस आमदाराला ED अधिकाऱ्यांनी असे पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 13:01 IST

Haryana Congress MLA Arrested: माजी काँग्रेस आमदार धर्मसिंह छोकर यांच्यावर दीनदयाळ आवास योजनेअंतर्गत 1500 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे.

Haryana Congress MLA  Arrested:अंमलबजावणी संचालनालयाने (ED) हरियाणातील माजी काँग्रेसआमदार धर्मसिंह छोकर यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. छोकर आणि त्यांच्या कंपनीवर दीनदयाळ आवास योजनेअंतर्गत 1500 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. दरम्यान, छोकर यांना अधिकाऱ्यांनी अटक करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत माजी काँग्रेसआमदार पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसतात. 

सविस्तर माहिती अशी की, माजी काँग्रेस आमदार धर्मसिंह छोकर आणि त्यांची कंपनी M/s Sai Aaina Farms Pvt. Ltd. वर फसवणूक आणि पैशांच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे. गुरुग्राम पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरू केला होता. याच प्रकरणात ईडीचे अधिकारी छोकर यांना अटक करण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. 

यादरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी धावत जाऊन धर्मसिंग छोकर यांना पकडले. धावता-धावता छोकर पडले, यावेळी त्यांची ईडी अधिकाऱ्यांशी बाचाबाचीही झाली, यात माजी आमदाराचा शर्टही फाटला. अखेर ईडी अधिकाऱ्यांनी कडक इशारा दिल्यानंतर छोकर गाडीत बसण्यास तयार झाले. या अटकेचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

मुलगा फरार, वडिलांना अटकधर्मसिंह हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते हरियाणाच्या समलखा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार राहिले आहेत. त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. अटकेपूर्वी ईडीने त्यांच्या घरावर आणि इतर ठिकाणांवर छापे टाकले होते. या छाप्यात पथकाला अनेक संशयास्पद व्यवहारांची माहिती. धर्मसिंह यांच्या मुलाविरोधातही ईडीने गुन्हा दाखल केला आहे. छोकरच्या अटकेनंतर ईडीची कारवाई आणखी तीव्र झाली आहे. विकास छोकर सध्या फरार असून, पोलिस शोध घेत आहेत.

 

टॅग्स :congressकाँग्रेसMLAआमदारfraudधोकेबाजीHaryanaहरयाणाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय