चंदिगड - हरयाणामध्येभाजपाला जबरदस्त धक्का बसला आहे. हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे कल हाती येऊ लागले आहेत. हरयाणातील ९० जागांपैकी सर्व जागांचे कल आता हाती आले आहे. या कलांमधून हरयाणामध्ये त्रिशंकू विधानसभेचे चित्र दिसत आहे. आतापर्यंतच्या कलांमध्ये भाजपा ४१ तर काँग्रेस २९ जागांवर आघाडीवर आहे. राज्यात जननायक जनता पार्टी किंगमेकर ठरण्याच्या मार्गावर आहे. जननायक जनता पक्षाला १२ जागांवर आघाडी आहे. तर इतर आठ ठिकाणी आघाडीवर आहे.
haryana election 2019 : हरयाणाची त्रिशंकू विधानसभेकडे वाटचाल, भाजपाला जबरदस्त धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 12:48 IST